मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : हिरो ते व्हिलन, रविंद्र जडेजाच्या दोन चुकांचा टीम इंडियाला फटका!

IND vs AUS : हिरो ते व्हिलन, रविंद्र जडेजाच्या दोन चुकांचा टीम इंडियाला फटका!

टीम इंडियाचा (Team India) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सिडनी टेस्टमध्ये बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे हिरो बनला होता. आता बॅटिंग करताना केलेल्या चुकांमुळे तो फॅन्ससाठी व्हिलन बनला आहे.

टीम इंडियाचा (Team India) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सिडनी टेस्टमध्ये बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे हिरो बनला होता. आता बॅटिंग करताना केलेल्या चुकांमुळे तो फॅन्ससाठी व्हिलन बनला आहे.

टीम इंडियाचा (Team India) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सिडनी टेस्टमध्ये बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे हिरो बनला होता. आता बॅटिंग करताना केलेल्या चुकांमुळे तो फॅन्ससाठी व्हिलन बनला आहे.

सिडनी, 9 जानेवारी: टीम इंडियाचा (Team India) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या चपळ फिल्डिंसाठी प्रसिद्ध आहे. सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंमध्ये जडेजानं भन्नाट थ्रो करत स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) रन आऊट केलं होतं. त्याचा तो भन्नाट थ्रो हा दुसऱ्या दिवसाच्या खेळाची ठळक गोष्ट ठरला होता. सर्वांनीच जडेजाची त्याबद्दल प्रशंसा केली. त्याचबरोबर जडेजानं पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्सही घेतल्या. बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे हिरो ठरलेला जडेजा तिसऱ्या दिवशी बॅटिंग करताना व्हिलन ठरला आहे.

जडेजा का ठरला व्हिलन?

जडेजाची बॅटिंग गेल्या काही महिन्यांमध्ये सुधारली आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) मालिकेत याचा प्रत्यय आला आहे. सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही त्यानं नाबाद 28 रन काढत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याच्या दोन चुकांचा टीमला फटका बसला. या चुकांमुळेच तो काही तासांमध्येच फॅन्ससाठी हिरोचा व्हिलन झाला आहे.

जडेजाच्या दोन चुका

भारताची धावसंख्या 6 आऊट 195 अशी होती. त्यावेळी जडेजावर तळाच्या बॅट्समनना घेऊन भारताची इनिंग लांबवण्याची जबाबदारी होती. जडेजा सोबत अश्विन (R. Ashwin) बॅटींग करत होता. अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये चार शतक झळकावली आहेत. वेगानं रन काढण्याच्या प्रयत्नात जडेजानं अश्विनला रन आऊट केलं. अश्विनचं ‘रनिंग बिटविन द विकेट’ तितकं चांगलं नाही, याचं भान जडेजाला राहिलं नाही.

जडेजानं चार ओव्हर्सच्या नंतर हीच चूक पुन्हा केली. दोन रन घेण्याच्या नादात त्यानं जसप्रीत बुमराहला रन आऊट केलं. जडेजाच्या या दोन चुकांमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 रनची आघाडी मिळाली.

यापूर्वीही केली आहे चूक

जडेजानं सहकारी बॅट्समनला रन आऊट करण्याची चूक यापूर्वी देखील केली आहे. मेलबर्न टेस्टमध्ये जडेजाच्या चुकीमुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) रन आऊट व्हावं लागलं होतं. रहाणे तेंव्हा 112 रन वर खेळत होता. मोठी खेळी करण्यासाठी सज्ज झालेल्या रहाणे  जडेजाच्या चुकीमुळं आऊट झाला. त्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये जडेजानं हार्दिक पंड्याला रन आऊट केलं होतं. त्या मॅचमध्ये हार्दिकनं आऊट होण्यापूर्वी 43 बॉलमध्ये चार फोर आणि सहा सिक्सरच्या मदतीनं 76 रन काढले होते. हार्दिकला रन आऊट केल्याबद्दल तेंव्हा जडेजावर सोशल मीडियातून मोठी टीका झाली होती.

First published:

Tags: Cricket, India vs Australia