सिडनी, 10 डिसेंबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अॅडलेडमध्ये (Adelaide) होणाऱ्या पहिल्या टेस्टचं ‘काऊंट डाऊन’ (Count Down) आता सुरु झालंय. दोन्ही टीम्स पहिली टेस्ट जिंकून आघाडी घेण्यासाठी खास प्लॅन आखत आहेत. याचवेळी भारतीय टीमचा (Team India) एक मोठा प्लॅन लीक झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय टीमचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एका ड्रिंक पार्टीमध्ये (Drink Party) टीमचा खास प्लॅन लीक केला असा दावा ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी केला आहे. पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे.
शास्त्रींनी कोणती माहिती लीक केली?
भारतीय टीमचा मुख्य फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर येऊ शकला नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्यासोबत तिसरा फास्ट बॉलर अंतिम अकरामध्ये खेळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. या तिसऱ्या जागेसाठी उमेश यादव, नवदीप सैनी आणि आणि मोहम्मद सिराज असे तीन पर्याय भारतीय टीमकडे आहेत.
या तीन पर्यायामधून उमेश यादवची निवड आम्ही केली असून उमेश अंतिम अकरामध्ये खेळेल अशी माहिती शास्त्रींनी ड्रिंक पार्टीच्या दरम्यान दिली असा दावा चॅपल यांनी केला आहे.
हे वाचा-शेम टू शेम! IND VS AUS टी-20 सामना पाहायला आला विराटचा डुप्लिकेट, चाहतेही अवाक
उमेश यादवचा रेकॉर्ड
उमेश यादवसाठी यंदाची आयपीएल स्पर्धा चांगली गेली नव्हती. या स्पर्धेतील बहुतेक काळ तो बेंचवर होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याने चांगली बॉलिंग केली. या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017-18 साली झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये उमेश हा सर्वात जास्त विकेट्स घेणारा फास्ट बॉलर होता. उमेशनं त्या मालिकेत 17 विकेट्स घेतल्या होत्या. उमेशच्या अनुभवाचा भारतीय टीमला फायदा होईल अशी आशा आहे. मात्र पहिल्या टेस्टपूर्वीच ही माहिती कोच रवी शास्त्रींकडून लीक झाल्यानं आता ऑस्ट्रेलियन टीम उमेशच्या बॉलिंगचा आणखी अभ्यास करुन मैदानात उतरण्याची शक्यता आहे.