मेलबर्न, 30 डिसेंबर : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कॅप्टनसीखाली टीम इंडियाने मेलबर्न टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. या ऐतिहासिक विजयाबरोबरच टीम इंडियानं 4 टेस्टच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताचा प्रमुख बॉलर आर. अश्विननं (R. Ashwin) या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अश्विननं मेलबर्न टेस्टमध्ये एकूण 5 विकेट्स घेतल्या. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेन यांना आऊट केलं. तर दुसऱ्या इनिंगमध्ये मार्नस लाबुशेन आणि जोश हेजलवूडला आऊट केलं. मेलबर्नमधील विजयानंतर अश्विनची बायको प्रिती अश्विननं (Prithi Ashwin) एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
मेलबर्नमधील विजयानंचर अश्विननं रहाणे, जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यानं हा फोटो शेअर करत टीमचं अभिनंदन केलं होतं. त्याचबरोबर पहिली टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिरजचंही अश्विननं कौतुक केलं होतं. अश्विनची बायको प्रितीनं अश्विनचं हे ट्विट री ट्विट केलं आहे.
काय म्हणाली प्रिती?
प्रिती अश्विननं टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर, ‘आपण आजवर कोणतीही टेस्ट मॅच जिंकल्यानंतर अश्विनला इतकं आनंदी पाहिलं नाही’, असं प्रिती सांगितलं.
‘’अश्विन खेळत असताना टीम इंडियानं जिंकलेल्या प्रत्येक टेस्टनंतर मी त्याच्याशी बोलले आहे. त्याचबरोबर मी अश्विनला पाहिलं देखील आहे. मागच्या 10 वर्षात त्याच्या डोळ्यात इतका आनंद, समाधान आणि निवांतपण मी पाहिलेलं नाही,’’ असंही प्रिती म्हणाली.
I have seen/ spoken to Ashwin after every Test he has played and after a lot of wins. But I have never seen him this happy, satisfied and light (can I say?) with a smile in his eyes in almost 10 years. https://t.co/8f0qUW489S
— Prithi Ashwin (@prithinarayanan) December 29, 2020
टीम इंडियात एक बदल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसरी टेस्ट सात जानेवारीपासून सिडनीमध्ये होणार आहे. तर चौथी आणि अंतिम टेस्ट 15 ते 19 जानेवारी दरम्यान ब्रिस्बेनमध्ये खेळली जाईल. मेलबर्नमधील विजयांतर सिडनी टेस्टही जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाच्या विजयी टीममध्ये एक बदल होण्याची शक्यता आहे. हिटमॅन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीमममध्ये पुनरागमन निश्चित आहे.