ब्रिस्बेन, 15 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील या मालिकेतील चौथी आणि टेस्ट सुरु झाली आहे. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गॅबा (Gabba) पिचवर सुरु झालेल्या या टेस्टमध्ये भारतीय टीम दुखापतींचा सामना करत आहे. वरीष्ठ खेळाडू जखमी असल्यानं टीम इंडियानं (Team India) या टेस्टमध्ये दोन खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली आहे. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) आणि टी. नटराजन (T Natrajan) या दोन खेळाडूंच्या पदार्पणासह भारतीय टीमनं या टेस्टमध्ये एकूण चार बदल केले.
सिडनी टेस्टमधील हिरो आर. अश्विन आणि हनुमा विहारीच्या जागी मयंक अग्रवाल आणि शार्दुल ठाकूरला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. या मॅचच्या दरम्यान नवदीप सैनी जखमी होऊन मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे त्याच्या जागेवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) फिल्डिंगसाठी मैदानात उतरला होता.
पृथ्वी झाला ट्रोल!
पृथ्वी शॉ फिल्डिंगसाठी उतरला तेंव्हा मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड ही जोडी मैदानामध्ये स्थिरावली होती. त्यांनी 113 रन्सची भागिदारी केली होती. काही ठराविक अंतरानं ऑस्ट्रेलियाला चौकार मिळत होते. त्याचबरोबर एकेरी धावा देखील दोन्ही बॅट्समन सफाईनं काढत होते.
या भागिदारीच्या दरम्यान वेडनं एक फटका मारला आणि तो एक रन काढण्यासाठी वेगानं पळाला. पृथ्वी शॉ नं तो बॉल अडवला आणि नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. त्यावेळी त्याचा थ्रो बॉलरपर्यंत जाण्यापूर्वीच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) छातीवर लागला. या थ्रो मुळे पृथ्वी शॉ सध्या ट्रोल होत आहे.
पृथ्वीनं फेकलेला बॉल लागल्यानंतही रोहितनं कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांत उभा होता. या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंट्रेटरला मात्र हसू आवरलं नाही. ‘भारत आणखी दुखापत सहन करु शकणार नाही.’ असं त्यांनी म्हंटलं. पृथ्वी शॉ चा हा थ्रो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
⚠ Friendly fire ⚠
Live #AUSvIND: https://t.co/IzttOVtrUu pic.twitter.com/8naJ3ykMe7 — cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2021
When you need 1 player to make it injured XI
— Nikhil (@_nikhil_gupta_) January 15, 2021
Jealous of rohit for stealing his spot...😂#AUSvIND
— AP 🇬🇧🇮🇳🇹🇿🇿🇦 (@Villiers076) January 15, 2021
ऑस्ट्रेलियाचा स्कोअर काय झाला?
मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या मदतीनं ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसाखेर 5 आऊट 274 रन केले आहेत. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियानं पहिल्या दोन विकेट झटपट गमावल्या. त्यानंतर लाबुशेननं पहिल्यांदा स्मिथ आणि नंतर वेडच्या मदतीनं ऑस्ट्रेलियाला सावरलं.
भारताकडून या टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या टी. नटराजननं 2 तर वॉशिंग्टन सुंदरनं 1 विकेट घेतली. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरलाही एक-एक विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia