IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियात पहिली डे-नाईट टेस्ट, गुलाबी बॉलवर लागणार बॅट्समन्सची कसोटी!

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियात पहिली डे-नाईट टेस्ट, गुलाबी बॉलवर लागणार बॅट्समन्सची कसोटी!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची (Border -Gavaskar Trophy) मालिकेची सुरुवात डे-नाईट टेस्टनं होणार आहे. या टेस्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या गुलाबी बॉलमुळे बॅट्समन्सची चांगलीच परीक्षा होणार आहे.

  • Share this:

 अ‍ॅडलेड, 16 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची (Border -Gavaskar Trophy)  मालिकेची सुरुवात डे-नाईट टेस्टनं होणार आहे. रात्री लाईटच्या प्रकाशात बॉल नीट दिसावा यासाठी डे-नाईट टेस्टमध्ये खास गुलाबी बॉल वापरला जातो. त्यामुळे या टेस्टला पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) असंही म्हणतात. या टेस्टमध्ये गुलाबी बॉलवर खेळताना बॅट्समन्सची चांगलीच परीक्षा होईल, असं मत ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं (Pat Cummins) व्यक्त केले आहे.

काय म्हणाला कमिन्स?

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या टीमचा कमिन्स सदस्य आहे. भारताविरुद्धच्या सीरिजसाठी तो सध्या कसून सराव करतोय. “आम्ही उत्साहित आहोत, नर्व्हस नाही. ही टेस्ट नेहमीपेक्षा कमी वेगळी असेल. यामध्ये अंधूक प्रकाशात बॉलचा वेग वेगळा असतो. त्याचबरोबर डिनरनंतर फ्लड लाईट सुरु होईल त्यावेळी बॉल अधिक बाऊन्स होईल आणि त्याला वेग असेल. त्यामुळे कधी बॅटिंग करायची आणि कधी बॉलिंग करणे योग्य असेल याचा अंदाज कॅप्टनला घ्यावा लागेल,’’  असं कमिन्सनं सांगितले.

“ऑस्ट्रेलियात होणारी ही मालिका जिंकण्याची आमची इच्छा आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय टीम आमच्यापेक्षा चांगली होती. त्यामुळे त्यांनी आमचा पराभव केला. आता आमच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे परतले आहेत. हे दोघं जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहेत. त्याचबरोबर आमच्याकडं ट्रेव्हीस हेड, मार्नस लबूशेन सारखे गुणवान खेळाडू देखील आहेत,’’ याची आठवण देखील कमिन्सनं करुन दिली.

डे-नाईट टेस्टमध्ये कोण भारी?

ऑस्ट्रेलियानं आजवर चार डे-नाईट टेस्ट जिंकल्या आहेत. न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चार वेगवेगळ्या देशांना त्यांनी पराभूत केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट होणार आहे. भारतानं आजवर फक्त एकच डे-नाईट टेस्ट खेळली आहे. कोलकातामध्ये 2019 साली झालेल्या त्या टेस्टमध्ये भारतानं बांगलादेशचा सहज पराभव केला होता. भारतानं 2018-19 साली ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकली होती.

Published by: News18 Desk
First published: December 16, 2020, 11:36 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या