मुंबई, 22 जानेवारी : टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा टेस्ट सीरिज जिंकून इतिहास घडवला आहे. क्रिकेट फॅन्स हा विजय कधीही विसरणार नाहीत. त्याचबरोबर क्रिकेट कमी पाहणारी मंडळी देखील सध्या या विजयाबद्दल अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीमचं कौतुक करत आहेत.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये हंगामी कॅप्टन अजिंक्य रहाणेनं टीमला एकत्र केलं, त्यांना विश्वास दिला. प्रत्येक अडचणींना धैर्यानं तोंड दिलं. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ब्रिस्बेनमध्ये भारतीय टीमनं पराभव केला. या मालिका विजयानंतर सध्या देशभर आनंदाचं वातावरण आहे. या टीममधल्या सर्व खेळाडूंचा त्यांच्या गावी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
पाकिस्तातूनही अभिनंदन!
भारताच्या या विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानही त्याला अपवाद नाही. पाकिस्तानमधील 24/7 उर्दू न्यूज चॅनलचा एक व्हिडीओ (VIDEO) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. बाबर हयात (Babar Hayat) या अँकरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भारतीय टीमचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. टीम इंडियानं सर्व अडचणींवर मात करुन विजय मिळवला. स्थानिक भाषेत ‘मुलांच्या हातून ऑस्ट्रेलियाची धुलाई’ असं या विजयाचं वर्णन करता येईल, असं बाबर यांनी सांगितलं.
ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंचं बाबर यांनी विशेष अभिनंदन केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे.
Pakistani media on India's victory. 😎 pic.twitter.com/XzAcM5Di0p
— Trendulkar (@Trendulkar) January 19, 2021
वासिम अक्रमही फिदा!
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीवर पाकिस्तानचा माजी कॅप्टन वासिम अक्रम (Wasim Akram) देखील फिदा झाला आहे. 'मी इतकी बोल्ड आणि लढाऊ आशियाई टीम ऑस्ट्रेलियात खेळलेली पाहिली नाही. त्यांना कोणतीही अडचण रोखू शकली नाही. मुख्य खेळाडू जखमी होते. ही टीम 36 वर ऑल आऊट झाली होती. त्यानंतर ते दमदार पुनरागमन करत जिंकले आहेत. दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी. भारतीय टीमचं अभिनंदन’’ असं ट्विट अक्रमनं केलं आहे.
Incredible Test & series win for India have not seen a bold, brave & boisterous Asian team on a tougher tour of Australia. No adversity could stop them, frontline players injured, & won after a remarkable turn around from the depths of 36 all out, inspiring for others.kudos India
— Wasim Akram (@wasimakramlive) January 19, 2021
अख्तरनं दिलं दोघांना श्रेय
पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा देखील भारताच्या कामगिरीनं प्रभावित झाला आहे. या विजयाबद्दल त्याने टीम इंडियाचे अभिनंदन केलं आहे. त्याने विजयाचं श्रेय शोएबने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) या दोघांना दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia