सिडनी, 11 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या (Team India) एकजुटीचं दर्शन वारंवार होत आहे. अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) रन आऊट झाल्यावर न रागवता नाराज रविंद्र जडेजाची (Ravidra Jadeja) समजूत घातली होती. बुमराह आणि मोहम्मद सिराजला झालेल्या शिवीगाळच्या विरोधात टीम त्यांच्यासोबत भक्कम उभी आहे. भारतीय खेळाडूंमधील टीम वर्कचं आणखी एक उदाहरण सिडनी टेस्टच्या दरम्यान पाहयला मिळालं.
सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये मिचेल स्टार्कचा बॉल खेळताना रविंद्र जडेजा जखमी झाला. जडेजाच्या हाताला फॅक्चर झालं आहे. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग तसंच फिल्डिंग करु शकला नाही.
जडेजाचा हात फॅक्चर असल्यानं त्याला केळीचं साल सोलताना त्रास होत आहे. जडेजाची ही अडचण ओळखून नवदीप सैनीनं (Navdeep Saini) त्याला केळीचं साल काढून दिलं. जडेजा आणि सैनीच्या मैत्रीचा, परस्पर सामंजस्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.
A bit of teamwork, Saini peeling the banana for Jadeja 😅 #AUSvIND pic.twitter.com/O0KYKZT1a9
— 7Cricket (@7Cricket) January 11, 2021
हे वाचा-ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपली? काही मिनिटांत ऑनलाईन पद्धतीने असं करा रिन्यू
रविंद्र जडेजा सज्ज
दरम्यान, हाताला दुखापत झाली असूनही टीमला गरज असेल तर रविंद्र जडेजा दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. या व्हिडीओमध्ये जडेजा हातामध्ये ग्लोज घालून बॅटिंगसाठी सज्ज झालेला दिसतो.
भारतीय टीम पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला चांगलंच झुंजवलं आहे. अजिंक्य रहाणे झटपट आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत या जोडीनं 5 विकेट्ससाठी 148 रनची भागिदारी केली. पुजारा 77 तर पंत 97 रन काढून आऊट झाला. ही जोडी परतल्यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन या जोडीनं टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सची परीक्षा पाहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket