मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ‘हनुमा विहारीवर विश्वास दाखवा’, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा सल्ला

IND vs AUS : ‘हनुमा विहारीवर विश्वास दाखवा’, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा सल्ला

भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद (MSK Prasad) यांनी टीम मॅनेंजमेंटला एक सल्ला दिलाय.

भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद (MSK Prasad) यांनी टीम मॅनेंजमेंटला एक सल्ला दिलाय.

भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद (MSK Prasad) यांनी टीम मॅनेंजमेंटला एक सल्ला दिलाय.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 21 डिसेंबर:  बॉर्डर गावसकर (Border Gavaskar ) ट्रॉफीमधील पहिली टेस्ट मोठ्या फरकानं हरल्याने भारतीय टीम अडचणीत सापडली आहे. भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आता पितृत्वाच्या रजेवर (Paternity leave)  गेला आहे. त्यामुळे 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये 'कोहलीच्या ऐवजी कोण खेळणार?' आणि 'कोहलीच्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार?' हे प्रश्न विचारले जात आहेत. भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद (MSK Prasad) यांनी याबाबत टीम मॅनेंजमेंटला एक सल्ला दिलाय. भारताच्या मिडल ऑर्डरमधील बॅट्समन हनुमा विहारीने (Hanuma Vihari) प्रसाद यांना चांगलंच प्रभावित केले आहे. त्यामुळे विहारीवर टीम मॅनेजमेंटनं अधिक विश्वास दाखवावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. ‘विहारी निर्भिड मुलगा आहे’ “हनुमा विहारीकडे टेस्ट खेळण्यासाठी चांगलं तंत्र आहे. तसेच तो सकारात्मक खेळाडू आहे. तो भारतीय टीमकडून दीर्घकाळ खेळू शकतो. त्याला येत्या काही टेस्टमध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करताना पाहणे मला आवडेल. तो एक निर्भिड मुलगा आहे. तो चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे,” असं मत प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये लोकेश राहुलला देखील चांगली संधी आहे. तो सहाव्या क्रमांकवरचा उत्तम बॅट्समन होऊ शकतो, असंही प्रसाद यांनी स्पष्ट केले. पंत टीममध्ये हवा? निवड समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या प्रसाद यांनी यावेळी ऋषभ पंतवरही (Rishabh Pant) त्यांचे मत मांडले. “पंतचा फिटनेस मागील काही महिन्यात सुधारला आहे. त्याने गुलाबी बॉलवर झालेल्या सराव सामन्यातही चांगला खेळ केला होता. त्यामुळे पुढील तीन टेस्टमध्ये त्याला संधी दिली तर त्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल’’ असे त्यांनी सांगितले. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया A विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात आक्रमक शतक केले होते. त्यानंतर त्याचा टीममध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यातही पंतने शतक झळकावले आहे.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या