Home /News /sport /

IND v AUS – सिडनी टी 20 पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; प्रमुख खेळाडूची मालिकेमधून माघार

IND v AUS – सिडनी टी 20 पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; प्रमुख खेळाडूची मालिकेमधून माघार

सिडनीमध्ये (Sydney) आज (रविवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्यात दुसरा टी 20 (T20) सामना होणार आहे. या टी20 पूर्वी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) मालिकेमधून माघार घेतली आहे.

    सिडनी, 6 डिसेंबर:  सिडनीमध्ये (Sydney) आज (रविवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्यात दुसरा टी 20 (T20) सामना होणार आहे. या टी20 पूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) उर्वरित टी 20 मालिकेमधून माघार घेतली आहे. स्टार्कने तशी सूचना ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटला दिली आहे. स्टार्कने का घेतली माघार? स्टार्कच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी पडल्याने त्याने माघार घेतली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. “कुटुंबापेक्षा कोणतीही गोष्ट जगात मोठी नाही. मिचेल स्टार्कच्या निर्णयाचा आम्ही पूर्ण आदर करतो. तो त्याला वाटेल तेंव्हा टीममध्ये परत येऊ शकतो’’, असे ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लॅँगरने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का मिचेल स्टार्कने टीममधून माघार घेतल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तीन टी 20 सामन्यांच्या या मालिकेत कॅनबेरामध्ये झालेला पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसरी मॅच जिंकणे आवश्यक आहे. मिचेल स्टार्क तिसऱ्या टी-20 सह 17 डिसेंबरला सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्येही खेळण्याची शक्यता कमी असल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या वन-डेमध्ये स्टार्कची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्याला दोन वन-डेमध्ये फक्त एकच विकेट घेता आली. त्यानंतर टी20 सामन्यात अनुभवी स्टार्कने पुनरागमन केले होते. पहिल्या टी 20 सामन्यात त्याने 34 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. अनुभवी शिखर धवनला फक्त 1 रनवर आऊट करत स्टार्कने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली होती. टीम इंडियाला विक्रमाची संधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जास्त T20 जिंकण्याच्या बाबतीमध्ये भारत आणि पाकिस्तान आता संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. ही सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर होती. पहिली मॅच जिंकून टीम इंडियाने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आता या सीरिजमधील आणखी दोन मॅच बाकी आहेत. त्यामुळे त्या जिंकून टीम इंडियाला पाकिस्तानला मागे टाकत नवा विक्रम करण्याची संधी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या