मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: मयंक अग्रवालने दाखवली बॉल चमकवण्याची नवी पद्धत, VIDEO व्हायरल

IND vs AUS: मयंक अग्रवालने दाखवली बॉल चमकवण्याची नवी पद्धत, VIDEO व्हायरल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी मयंकनं अग्रवालनं (Mayank Agarwal) ही पद्धत दाखवली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी मयंकनं अग्रवालनं (Mayank Agarwal) ही पद्धत दाखवली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी मयंकनं अग्रवालनं (Mayank Agarwal) ही पद्धत दाखवली

ब्रिस्बेन, 18 जानेवारी : कोरोना व्हायरस महामारीनं (Corona Pandemic) सर्व जगाला त्याच्या प्रभावाखाली घेतलं आहे. जगातील प्रत्येक क्षेत्रावर कोव्हिड-19 चा परिणाम झाला आहे. जगातील अनेक भागांना यामुळे कित्येक महिने लॉकडाऊनमध्ये काढावे लागले आहेत.

या सर्व आघातानंतर जग पुन्हा सुरु झालं आहे. या नव्या जगात वावरताना यापूर्वीच्या सर्व गोष्टी करणं शक्य नाही. नव्या निर्बंधांसह प्रत्येकाला या नव्या जगाशी जुळवून घेणं भाग आहे. अन्य क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. जवळपास प्रत्येक खेळाडू 2020 मध्ये मोठा काळ मैदानापासून दूर त्याच्या घरामध्ये बंदिस्त होता. आता हळूहळू पुन्हा एकदा खेळांना सुरुवात झाली आहे.

क्रिकेट हा खेळ देखील त्याला अपवाद नाही. अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर क्रिकेट पुन्हा सुरु झालं. मात्र त्यावेळी अनेक नवे नियम आणि निर्बंधांचं पालन करणं हे क्रिकेटपटूंना बंधनकारक आहे. यामधील एका नव्या नियमानुसार बॉलला लाळ (Saliva) लावण्यास बंदी आहे. या नियमावर मोठी चर्चा झाली होती. आता खेळाडूंनी यावर देखील मार्ग काढला आहे.

(वाचा - IND vs AUS: हिंदू कुटुंबात जन्मलेल्या मुलाचं नाव ‘वॉशिंग्टन’का?)

काय आहे नवी पद्धत?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी मयंकनं अग्रवालनं (Mayank Agarwal) ही पद्धत दाखवली. चौथ्या दिवशी शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) बॉलिंग करत होता. त्यावेळी मयंकनं शार्दुलच्या हाताला आलेला घाम बॉलनं रगडला आणि तो बॉल शार्दुलकडं दिला. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

(वाचा - IND vs AUS: सुनील गावसकरांची टीम इंडियाला मानवंदना, पाहा VIDEO)

क्रिकेटपटूंवर अनेक निर्बंध

सध्या संपूर्ण जगभर सुरु असलेली कोणतीही क्रिकेटची मालिका ही बायो बबलच्या नियमांमध्ये होते. या बायो बबलमध्ये असलेल्या व्यक्तींचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. सर्व क्रिकेटपटू, कोचिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ इतकंच नाही तर खेळाडू राहत असलेल्या हॉटेलचे कर्मचारी या सर्वांची बयो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोना टेस्ट घेतली जाते. कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर या सर्वांना बायो बबलमध्ये प्रवेश दिला जातो. या बायो बबलमध्ये गेलेला कोणताही व्यक्ती तो कालावधी संपेपर्यंत बाहेर पडू शकत नाही. तसंच बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही.

First published:

Tags: Cricket, India vs Australia