Home /News /sport /

IND vs AUS: या सीझनमध्ये द्विशतक करणाऱ्या खेळाडूचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश, ओपनिंगला मिळू शकते संधी

IND vs AUS: या सीझनमध्ये द्विशतक करणाऱ्या खेळाडूचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश, ओपनिंगला मिळू शकते संधी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) होणाऱ्या पहिल्या टेस्टचं काऊंटडाऊन सुरु झालंय. या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये फॉर्मात असलेल्या मार्कस हॅरीसचा (Marcus Harris) समावेश करण्यात आला आहे.

    सिडनी, 12 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात  अ‍ॅडलेडमध्ये (Adelaide) होणाऱ्या पहिल्या टेस्टचं काऊंटडाऊन सुरु झालंय. प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकण्याचा निर्धार ऑस्ट्रेलियन टीमनं केला आहे. मात्र, प्रमुख खेळाडू सतत दुखापग्रस्त होत असल्यानं ऑस्ट्रेलियन टीमला पहिली टेस्ट सुरु होण्यापूर्वीच अनेक धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियन टीमला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मार्कस हॅरीसचा (Marcus Harris) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. हॅरीसला विल पुकोवस्कीच्या ऐवजी संधी देण्यात आली आहे. भारताविरुद्ध मागच्या आठवड्यात झालेल्या सराव सामन्यात पुकोवस्कीच्या डोक्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुखापतीमुळे आगोदरच पहिल्या टेस्टमधून माघार घेतली असून, तो बॉक्सिंग डे टेस्ट खेळणार का याचा सस्पेंन्स अजून कायम आहे. कोण आहे हॅरीस? मार्कस हॅरीसने भारताविरुद्धच 2018 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. चार टेस्टच्या आठ इनिंगमध्ये त्याने 37 च्या सरासरीनं 258 रन काढले होते. त्यानंतर झालेल्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये तो संपूर्ण फ्लॉप ठरला. इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगसमोर त्याचं तंत्र साफ उघडं पडलं. त्याला तीन टेस्टमधील सहा इनिंगमध्ये फक्त 58 रन करता आले. हॅरीसनं या अपयशानंतर बॅटिंगमधलं तंत्र सुधारण्यावर मोठी मेहनत घेतली आहे. फॉर्ममध्ये हॅरीस हॅरीस या सीझनमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. त्याने शेफील्ड शील्ड स्पर्धेत द्विशतक झळकावलं होतं. व्हिक्टोरिया टीमकडून त्यानं आतापर्यंत फक्त तीन इनिंगमध्येच 355 रन काढले आहेत. त्यामुळे भाराताविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यात त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पहिल्या सामन्यात त्याने 35 आणि नाबाद 25 रन काढले. तर दुसऱ्या सराव सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये तो 26 रनवर मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर आऊट झाला होता. ऑस्ट्रेलिया अडचणीत ऑस्ट्रेलियन टीमसमोर सध्या ओपनिंगची मोठी समस्या आहे. डेव्हिड वॉर्नरनं दुखापतीमुळं  पहिल्या टेस्टमधून माघार घेतली आहे. तर टीममधला दुसरा स्पेशालिस्ट ओपनर जो बर्न्स सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्यानं या सीझनमधील आठ इनिंगमध्ये फक्त 61 रन काढले आहेत. भारताविरुद्धच्या पिंक बॉल सराव सामन्यातील पहिल्या इनिंगमध्येही तो शून्यावर आऊट झाला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या