Home /News /sport /

IND vs AUS: टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बॉर्डर-गावसकर मालिकेतून आऊट!

IND vs AUS: टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बॉर्डर-गावसकर मालिकेतून आऊट!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. सिडनी टेस्टपूर्वी आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे टीममधून आऊट झाला आहे.

    सिडनी, 5 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. यापूर्वी मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि उमेश यादव (Umesh Yadav) हे दोन फास्ट बॉलर या मालिकेतून आऊट झाले आहेत. आता त्यापाठोपाठ टीम इंडियाचा (Team India) बॅट्समन के.एल. राहुल (K.L. Rahul) या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. बीसीसीसीआय (BCCI) नं ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. राहुलला काय झालं? शनिवारी मेलबर्नमध्ये बॅटिंगचा सराव करताना राहुलचं डावं मनगट दुखावलं होतं. त्यामुळे तो आता उर्वरित दोन टेस्ट खेळू शकणार नाही, असं BCCI नं स्पष्ट केलं आहे. त्याला संपूर्णपणे फिट होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. राहुलच्या जागेवर टीममध्ये कोणत्याही खेळाडूची निवड अजून करण्यात आलेली नाही. राहुल आता लवकरच भारतामध्ये परतणार असून बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत. राहुल या टेस्ट मालिकेत एकही मॅच अजून खेळलेला नव्हता. आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मालिकेसाठी निवड होण्यापूर्वी त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सात जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरु होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या