IND vs AUS: 'खेळाडूंच्या दुखापतीसाठी IPL जबाबदार', ऑस्ट्रेलियाच्या कोचचा दावा

IND vs AUS: 'खेळाडूंच्या दुखापतीसाठी IPL जबाबदार', ऑस्ट्रेलियाच्या कोचचा दावा

IPL स्पर्धेचं बदललेलं वेळापत्रकच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) मालिकेच्या दरम्यान खेळाडूंना झालेल्या दुखापतींना जबाबदार आहे, असा दावा ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी केला आहे.

  • Share this:

सिडनी, 13 जानेवारी :  कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2020) सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान खेळवण्यात आली. IPL स्पर्धेचं बदललेलं वेळापत्रकच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) मालिकेच्या दरम्यान खेळाडूंना झालेल्या दुखापतींना जबाबदार आहे, असा दावा ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी केला आहे. या स्पर्धेमुळे अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले. तसंच ऑस्ट्रेलियाच्या टीमला फिटनेसच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला.

लँगर यांनी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितलं की, “या सीझनमध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची मोठी यादी आहे. माझ्या मते IPL 2020 चं वेळापत्रक योग्य नव्हतं. इतक्या मोठ्या सीरिजपूर्वी तर ही स्पर्धा नक्कीच योग्य नव्हती.’’ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मोहम्मद शमी, के.एल. राहुल आणि उमेश यादव हे भारतीय खेळाडू यापूर्वीच दुखापतीमुळे या सीरिजमधून बाहेर पडली आहेत. आता या यादीत रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांची भर पडली आहे.

IPL स्पर्धा आवडते पण...

जस्टीन लँगर यांनी यावेळी IPL स्पर्धेची प्रशंसाही केली आहे. “मला आयपीएल स्पर्धा आवडते. माझ्या तरुणपणी कौंटी क्रिकेट होते. ते खेळल्यामुळे कौशल्यांचा विकास होत असे. आता आयपीएलमुळे मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचमधील कौशल्यांमध्ये भर पडते. मात्र यंदा स्पर्धेचं टायमिंग बरोबर नव्हते. याबाबत समीक्षा होईल, अशी माझी खात्री आहे,’’ असं लँगर यांनी स्पष्ट केलं. बुमराह आणि जडेजा यांच्या अनुपस्थितीचा ब्रिस्बेन टेस्टमध्ये नक्की परिणाम जाणवेल, असंही त्यांनी सांगितलं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border - Gavaskar Trophy) मधील चौथी आणि निर्णायक टेस्ट 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं तर दुसरी टेस्ट भारतानं जिंकली होती. सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली.

Published by: News18 Desk
First published: January 13, 2021, 4:55 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading