Home /News /sport /

IND vs AUS: क्रिकेटपटूंना ‘पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी’ वागणूक देण्यावर टीम इंडियाचा आक्षेप

IND vs AUS: क्रिकेटपटूंना ‘पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी’ वागणूक देण्यावर टीम इंडियाचा आक्षेप

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मालिकेनं नव्या वर्षात वादग्रस्त वळण घेतलं आहे. क्रिकेटपटूंना ‘पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी’ वागणूक देण्यावर टीम इंडियानं (Team India) आक्षेप नोंदवला आहे.

    सिडनी, 4 जानेवारी:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मालिकेनं नव्या वर्षात वादग्रस्त वळण घेतलं आहे. रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर हा वाद सुरु झाला. याबाबत ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये आलेल्या बातम्यांवर BCCI नं यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटपटूंना ‘पिंजऱ्यातील प्राण्यांसारखी’ वागणूक देण्यावर टीम इंडियानं (Team India) आक्षेप नोंदवला आहे. क्रिकेटपटूंना दुहेरी वागणूक का? ‘क्रिकबझ’ नं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेटपटूंनी एकाच हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहावं लागत पण त्याचवेळी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) त्यांचा खेळ पाहण्यासाठी 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्यात येते हा विरोधाभास आहे. ‘आम्ही सामान्य ऑस्ट्रेलियन नागरिक पाळतात ते सर्व नियम पाळण्यास तयार आहोत हे पूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मैदानात गर्दीला आतामध्ये येण्याची परवानगी मिळत असेल तर आम्हाला ‘पिंजऱ्यातील प्राण्यांसारखं’ हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात काहीही अर्थ नाही.’ असं टीम इंडियानं स्पष्ट केलं आहे. ब्रिस्बेनमधील नियमांवर आक्षेप भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. ब्रिस्बेनमधील नियमांनुसार टीम इंडियाला हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहावं लागणार आहे. हा नियम मान्य नसल्याचं टीमनं यापूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) कळवलं आहे. ‘आता दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात क्वारंटाईन राहण्याची आमची इच्छा नाही. आम्ही बाहेर जाताना मास्कचा वापर  रेड झोनमध्ये न जाणं यासह सर्व सरकारी नियमांचं पालन करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र हॉटेलमधील हलचालींवरही नियंत्रण आणल्यास ब्रिस्बेनमध्ये टेस्ट खेळण्याची आमची इच्छा नाही.’ असं टीमनं स्पष्ट केलं आहे. भारतीय क्रिकेटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रोहित शर्मासह पाच खेळाडूंना बाहेर पाऊस सुरु झाल्यानंच हॉटेलच्या आतमध्ये जावं लागलं. आमच्या खेळाडूंनी या मालिकेसाठी भरपूर त्याग केला आहे. मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं तरीही तो भारतामध्ये गेला नाही. काही खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून सलग बायो बबलमध्ये आहेत. ही सोपी गोष्ट नाही, असं भारतीय टीमनं सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या