मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : पहिल्या सत्रावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला दोन धक्के

IND vs ENG : पहिल्या सत्रावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला दोन धक्के

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमधील पहिल्या सत्रात टीम इंडियानं कमबॅक केलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमधील पहिल्या सत्रात टीम इंडियानं कमबॅक केलं आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमधील पहिल्या सत्रात टीम इंडियानं कमबॅक केलं आहे.

चेन्नई, 5 फेब्रुवारी:  भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टमधील पहिल्या सत्रात टीम इंडियानं कमबॅक केलं आहे. रॉरी बर्न्स (Rory Burns) आणि डॉम सिब्ली (Dom Sibley) या जोडीनं सुरुवातीला सावध खेळ केला. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 63 रनची पार्टरनरशिप केली. मात्र त्यानंतर टीम इंडियानं कमबॅक केल्यानं लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोअर 2 आऊट 67  असा झाला आहे.

भारतामध्ये पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहची (Jaspreet Bumrah) अनोखी संधी सुरुवातीला हुकली. बुमराहच्या पहिल्याच बॉलवर रॉरी बर्न्सचा कॅच ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सोडला. बुमराह आणि इंशात शर्मा या अनुभवी जोडीविरुद्ध इंग्लंडच्या सलामीविरांनी सावध खेळ केला. त्यामुळे विराट कोहलीनं (Virat Kohli) अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या (R. Ashwin) हाती बॉल सोपवला.

अश्विनला पहिलं यश

भारतीय पिचवरील मोठा मॅच विनर असलेल्या आर. अश्विननं विराट कोहलीला निराश केलं नाही. त्यानं मैदानात जम बसलेल्या रॉरी बर्न्सला आऊट केलं. अश्विनच्या बॉलिंगवर बर्न्सचा कॅच दुसऱ्यांदा सोडण्याची चूक पंतनं केली नाही.

रॉरी बर्न्स आऊट होताच जसप्रीत बुमराहनं भारताला दुसरं यश मिळवून दिलं. बुमराहनं डॅन लॉरेन्सला खातंही उघडू दिलं नाही. लॉरेन्स आऊट झाल्यानं इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला (Joe Root)  लंचपूर्वीच बॅटींगला यावं लागलं आहे. जो रुटची ही शंभरावी टेस्ट आहे. या निमित्तानं एक स्पेशल कॅप देऊन रुटचा सन्मान करण्यात आला. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं ही कॅप रुटला दिली.

अक्षर पटेल दुखापतीमुळे आऊट

पहिल्या  टेस्टला  सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा ऑल राऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतीमुळे चेन्नई टेस्टमधून आऊट झाला आहे. अक्षरच्या डाव्या पायाचा गुडघा दुखावला आहे. अक्षर पटेलचा पहिल्यांदाच भारतीय टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला होता. चेन्नई टेस्टमधील अंतिम 11 मध्ये तो खेळण्याची शक्यता होती. मात्र दुखापतीमुळे त्याचं टेस्ट क्रिकेटमधील पदार्पण लांबलं आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. आता नव्या सीरिजच्या पहिल्याच दिवशी आणखी एक खेळाडू दुखापत ग्रस्त झाला आहे.

First published:

Tags: Cricket