मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS: ‘आयसीसी इन अ‍ॅक्शन’ बुमराह, सिराज यांना शिवीगाळ करणाऱ्यांचा शोध सुरु

IND vs AUS: ‘आयसीसी इन अ‍ॅक्शन’ बुमराह, सिराज यांना शिवीगाळ करणाऱ्यांचा शोध सुरु

सिडनी टेस्टच्या दरम्यान जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज (Jasprit Bumrah Racially abused) यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. टीम इंडियानं (Team India) या प्रकरणात मॅच रेफ्रीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची ICC नं गंभीर दखल घेतली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

सिडनी, 10 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये तिसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दरम्यान जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज (Jasprit Bumrah Racially abused) यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. टीम इंडियानं (Team India) या प्रकरणात मॅच रेफ्रीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची ICC नं गंभीर दखल घेतली आहे.

शोध मोहीम सुरु

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, सिडनीच्या मैदानावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींना पकडण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. सिडनीच्या मैदानात 800 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) मॅच पाहण्यासाठी आलेल्या 10 हजार प्रेक्षकांची सुरक्षा अधिकाऱ्याकडे माहिती आहे. मैदानातील अधिकाऱ्यांनी या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासलं आहे. या फुटेजच्या आधारावर दोषी व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

काय आहे प्रकरण?

या विषयावर समोर आलेल्या माहितीनुसार, सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. सिडनी टेस्ट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांनी त्यांना उद्देशून हे शब्द वापरले. सिराज आणि बुमराह यांना गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षक टार्गेट करत आहेत, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे सिडनीमध्ये सध्या केवळ 10 हजार प्रेक्षकांनाच मॅच पाहण्यासाठी परवानगी आहे.

मॅच रेफ्रीकडे तक्रार

टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  यानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. बुमराह आणि सिराज यांनीही या विषयावर सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर टीम मॅनेजमेंटनं प्रकरणाची तक्रार सिडनी टेस्टचे रेफ्री डेव्हीड बून यांच्याकडं केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वाद सुरुच

भारतीय टीमच्या या दौऱ्यात हे पहिलंच वादग्रस्त प्रकरण नाही. टीम इंडियानं मेलबर्न टेस्ट जिंकल्यानंतर रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच खेळाडूंवर बायो बबल प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन नियमांवरही वाद सुरु आहे

First published:

Tags: Cricket, India vs Australia