IND vs AUS : जडेजा-शमी बाऊन्सरवर जखमी, इयन चॅपल म्हणाले...

IND vs AUS : जडेजा-शमी बाऊन्सरवर जखमी, इयन चॅपल म्हणाले...

टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) बाऊन्सर (Bouncer) खेळाडू जखमी होण्याचं प्रमाण अचानक वाढले आहे. त्यामुळे या प्रकारावर बंदी घालण्यात यावी अशी चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये सुरु झाली आहे.

  • Share this:

अ‍ॅडलेड, 20 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) टेस्ट सीरिमधून मोहम्मद शमी (Mohammed Shami) आऊट झाला आहे. शमीला भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बाऊन्सर खेळताना दुखापत झाली होती. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत शमीच नाही तर दोन्ही देशातील अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, रवींद्र जडेजा, विल पुकोवोस्की, मोईसेस हेनरिक्स यांचा जखमी खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. यापैकी जडेजा, पुकोवोस्की आणि शमी हे बाऊन्सर जखमी झाले. जडेजा आणि पुकोवोस्कीला तर दुखापतीमुळे पहिल्या टेस्टमध्ये खेळता आले नव्हते.

टेस्ट क्रिकेटमध्ये बाऊन्सर खेळाडू जखमी होण्याचं प्रमाण अचानक वाढले आहे. त्यामुळे या प्रकारावर बंदी घालण्यात यावी अशी चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेपटू आणि समालोचक इयन चॅपल यांनी (Ian Chappel)  बाऊन्सरवरील बंदीच्या मागणीचा विरोध केला आहे. ‘ESPN Crickinfo’ या क्रिकेट वेबसाईटला लिहिलेल्या लेखात त्यांनी या विषयावरील मत मांडले आहे.

चॅपल यांचे काय मत आहे?

‘अनेकदा बॅट्समन शॉर्ट बॉल खेळताना फसतात. काही वेळा बॉल त्यांच्या छातीपर्यंत तर कधी कमरेपर्यंत उसळतो. तर कधी त्यांच्या डोक्याला दुखापत होते. त्यांनी बॉलवरील नजर हटवली तर ही दुखापत होण्याची शक्यता असते,’ यावेळी त्यांनी विल पुकोवस्कीचं उदाहरण दिले आहे.  भारत ‘अ’ विरुद्धच्या सराव सामन्यात कार्तिक त्यागीचा बाऊन्सर लागल्याने पुकोवस्कीला मैदान सोडावे लागले होते. याच दुखापतीमुळे तो पहिली टेस्ट देखील खेळू शकला नव्हता.

‘बॉलर्सची चूक नाही’

‘चॅपल यांनी यावेळी बॅट्समन्सना त्यांचं तंत्र अधिक सुधारण्याचा सल्ला दिला. टॉप ऑर्डरच्या बॅट्समनला बाऊन्सर लागत असेल तर तो त्याचा दोष आहे, बॉलरचा नाही. बॅट्समनचं फुटवर्क बिघवण्याचा बॉलरचा हेतू असतो. त्याला जखमी करण्याचा नाही. बाऊन्सरवर बंदी आणल्यास सध्या कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या मैंदानातील अंपायर्सवर आणखी ओझे वाढेल,’ असं त्यांनी स्पष्ट केले.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 4:14 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या