मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: ‘आता तरी 'या' तिघांचं महत्त्व समजेल', गांगुलीची टिप्पणी ठरतेय चर्चेचा विषय

IND vs AUS: ‘आता तरी 'या' तिघांचं महत्त्व समजेल', गांगुलीची टिप्पणी ठरतेय चर्चेचा विषय

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly)  सिडनी टेस्टच्या निकालानंतर एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) सिडनी टेस्टच्या निकालानंतर एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) सिडनी टेस्टच्या निकालानंतर एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 11 जानेवारी:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सिडनी टेस्टचे पडसाद संपूर्ण क्रिकेट विश्वात उमटले आहेत. टीम इंडियाच्या (Team India) लढाऊ वृत्तीची सर्वांनीच प्रशंसा केली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) या निकालानंतर एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

भारतानं 2001 साली कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फॉलो ऑन नंतर टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला होता. पुढं चेन्नईमध्येही टेस्ट जिंकत भारतानं ती सीरिज 2-1 अशी जिंकली होती. ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या टीमचा सौरव गांगुली कॅप्टन होता.

सध्या BCCI अध्यक्ष असलेल्या गांगुलीलाही या टीमकडून सीरिज जिंकण्याची अपेक्षा आहे. त्यानं सिडनी टेस्टनंतर केलेल्या ट्विटमध्ये तसं स्पष्टपणे सांगितलं आहे.

गांगुलीची प्रतिक्रिया

“आता सर्वांना पुजारा, पंत आणि अश्विन या तिघांचं महत्व समजलं असेल, अशी आशा आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन जगातील चांगली बॉलिंग खेळणं हे सोपं नसतं. त्याचबरोबर जवळपास 400 टेस्ट विकेट्स या सहजासहजी मिळत नाहीत. टीम इंडियानं चांगला लढा दिला. आता सीरिज जिंकण्याची वेळ आली आहे,’’ असं ट्विट गांगुलीनं केलं आहे.

चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) सिडनी टेस्टच्या दोन्ही इनिंगमंध्ये अर्धशतक झळकालं. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 176 बॉलमध्ये 50 रन काढले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 205 बॉलमध्ये 77 रनची संयमी खेळी केली.

ऋषभ पंतनं (Rishabh Pant) पहिल्या इनिंगमध्ये 36 रन काढले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्ये आक्रमक 97 रन काढत मॅचचं चित्र बदललं. अनुभवी स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) या मालिकेत सातत्यानं चांगली बॉलिंग केली आहे. सिडनी टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये त्यानं 128 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली. त्याच्या या झुंजार खेळीचा पराभव टाळण्यात मोलाचा वाटा आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार टेस्ट मॅचची सीरिज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. या सीरिजमधील चौथी आणि निर्णायक टेस्ट 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये सुरु होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Australia