IND vs AUS: हनुमा विहारीनं सांगितलं टीम इंडियाचं ‘विनिंग सिक्रेट’!

IND vs AUS: हनुमा विहारीनं सांगितलं टीम इंडियाचं ‘विनिंग सिक्रेट’!

भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavsakar Trophy) जिंकून इतिहास घडवला आहे. हे कसं झालं? या कामगिरी मागे काय प्रेरणा होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)  जिंकून इतिहास घडवला आहे. या मालिकेतील पहिल्या टेस्टमध्ये भारताचा मोठा पराभव झाला होता. या पराभावानंतर टीम इंडिया (Team India) पुढील तीन टेस्ट दणदणीत हरेल असा अनेकांचा अंदाज होता. भारतीय टीमनं या सर्वांचा अंदाज चुकवत मालिका जिंकली. हे कसं झालं?  या कामगिरी मागे काय प्रेरणा होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. टीम इंडियाचा सदस्य आणि सिडनी टेस्टचा हिरो हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) टीम इंडियाचं ‘विनिंग सिक्रेट’ (Winning Secret) सांगितलं आहे.

‘त्याची नंतर चर्चा नाही’

विहारीनं ‘ESPN क्रिकइन्फो’ या वेबसाईटला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यानं हे रहस्य सांगितलं आहे. 'टीममधील खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफनं नंतर कधीही 36 रनवर ऑल आऊट होण्याची चर्चा केली नाही. असं कधी झालंच नाही समजा. अ‍ॅडलेड विसरुन जा.  ही मालिका फक्त 3 टेस्टची आहे, असं समजून खेळा असं कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सांगितलं होतं', असं विहारीनं स्पष्ट केलं.

(हे वाचा-IND vs ENG: भारत दौऱ्यासाठी इंग्लंड टीम जाहीर, दोन बड्या खेळाडूंचं कमबॅक!)

सिडनीचा हिरो

विहारीसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी शास्त्रींची सूचना पाळली. त्यांनी पुढील तीन पैकी दोन टेस्ट जिंकल्या तर सिडनी टेस्ट ड्रॉ केली. सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात विहारीचा मोठा वाटा होता. त्यानं दुखापतीनंतरही जिद्दीनं खेळ करत 286 मिनिटं किल्ला लढवला. विहारीनं 161 बॉलमध्ये 23 रनची संयमी खेळी केली. त्याचबरोबर तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

(हे वाचा-सिराजचा खुलासा, सिडनी टेस्टमध्ये वर्णभेदी शेरेबाजीवर अंपायरने त्याला हे सांगितलं)

‘सर्व काही आजच करायचं होतं’

‘दुखापतीनंतरही इतका वेळ कसा तग धरलास?’ असा प्रश्न विहारीला विचारण्यात आला होता. त्यावेळी 'माझी मालिकेतील ही शेवटची टेस्ट आहे याची जाणीव झाली होती. त्यामुळे टीमसाठी काही करायचं असेल तर आजच करायचं आहे, हे मला माहिती होतं. एका बाजूनं त्रास होत होता. त्याचवेळी दुसरीकडं टीमसाठी काही करण्याची जिद्द होती. या जिद्दीनं त्रासावर मात केली याचा मला आनंद आहे', असं उत्तर विहारीनं दिलं.

Published by: News18 Desk
First published: January 22, 2021, 10:55 AM IST

ताज्या बातम्या