Home /News /sport /

IND vs AUS: सिडनी टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, ‘हा’ फास्ट बॉलर आऊट

IND vs AUS: सिडनी टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, ‘हा’ फास्ट बॉलर आऊट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) मालिकेत दोन्ही टीम्सना दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. ऑस्ट्रेलियाचा एक फास्ट बॉलर सिडनी टेस्टमधून आऊट झाला आहे.

    सिडनी, 7 जानेवारी:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) मालिकेत दोन्ही टीम्सना दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. सिडनी टेस्टपूर्वी भारताचा फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) दुखापतीमुळे या मालिकेतून आऊट झाला होता. आता ऑस्ट्रेलियन टीमला दुखापतीमुळे एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिंसन (James Pattinson) दुखापतीमुळे सिडनी टेस्टमधून आऊट झाला आहे. पॅटिंसन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अजून एकही टेस्ट खेळलेला नाही. मेलबर्नमधील बॉक्सिंग डे टेस्टच्या दरम्यान त्याला सुट्टी देण्यात आली होती. त्या सुट्टीदरम्यान तो घरी घसरुन पडला. यामुळे त्याला बरगड्यांना दुखापत झाली आहे. पॅटिंसनच्या बदल्यात अन्य कोणत्याही खेळाडूचं नाव क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार टेस्टची  मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकली होती. त्यानंतर मेलबर्नमध्ये टीम इंडियानं कमबॅक करत दुसरी टेस्ट आठ विकेट्सं जिंकली. त्यामुळे आता या मालिकेतील उर्वरित दोन टेस्ट या अधिक चुरशीच्या  होणार आहेत. डेव्हिड वॉर्नर खेळणार का? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सिडनी टेस्ट खेळणार का याबाबत संभ्रम अजून कायम आहे. वॉर्नरला शेवटच्या वन-डेमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो टी-20 मालिका आणि पहिल्या दोन टेस्ट खेळू शकला नव्हता. वॉर्नर अजूनही शंभर टक्के फिट झालेला नाही, तरीही त्याला मॅचमध्ये खेळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न आहे. वॉर्नरचा सिडनीमध्ये भन्नाट रेकॉर्ड ‘वॉर्नरला सिडनी टेस्टमध्ये खेळवण्याचा ऑस्ट्रेलिया प्रयत्न का करत आहे?’ याचं उत्तर हे त्याच्या सिडनीमधील कामगिरीमध्ये दडलं आहे. सिडनीच्या मैदानावर वॉर्नरचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. वॉर्नरनं सिडनीमध्ये एकूण पाच टेस्ट खेळल्या आहेत. या पाच टेस्टमधील आठ डावात त्यानं चार शतक आणि दोन अर्धशतक झळकावली आहेत. वॉर्नरनं भारताविरुद्ध 2015 साली झालेल्या सिडनी टेस्टमध्येही शतक झळकावलं होतं. 2018 आणि 2019 या दोन वर्षांचा अपवाद वगळता वॉर्नरनं प्रत्येक वर्षी सिडनीमध्ये शतक झळकावले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या