IND vs AUS - ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का, तिसऱ्या टेस्टमधूनही ‘हा’ दिग्गज खेळाडू आऊट?

वॉर्नरवर (David Warner) यापूर्वी सिडनीमध्ये उपचार सुरु होते. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता.

वॉर्नरवर (David Warner) यापूर्वी सिडनीमध्ये उपचार सुरु होते. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता.

  • Share this:
    मेलबर्न, 27 डिसेंबर :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अपयशी ठरत आहेत. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात जो बर्न्स (Joe Burns) शून्यावर आऊट झाला. तर मॅथ्यू वेडला (Mathhew Wade) फक्त 30  रन करता आले. भक्कम सलामीसाठी तिसऱ्या टेस्टची वाट पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) तिसरी टेस्टही खेळण्याची शक्यता कमी आहे. वन-डे मालिकेच्या दरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो टी-20 मालिका आणि पहिल्या दोन टेस्ट खेळू शकलेला नाही. वॉर्नर सध्या संपूर्णपणे फिट होण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे, पण तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी दिली आहे. वॉर्नरवर यापूर्वी सिडनीमध्ये उपचार सुरु होते. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता. मात्र अजूनही तो दुखापतीमधून बरा न झाल्यानं मेलबर्न टेस्ट खेळू शकला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरी टेस्ट नियोजीत वेळापत्रकानुसार सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीमधील परिस्थती नियंत्रणात आली नाही तर ही टेस्ट मेलबर्नमध्येच खेळवण्यात येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) यापूर्वीच तशी माहिती दिली आहे. रोहित शर्मा तिसरी टेस्ट खेळणार? टीम इंडियासाठी तिसऱ्या टेस्टपूर्वी एक गुड न्यूज आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा  (Rohit Sharma) क्वारन्टाइन कालावधी संपत आलेला असून तो 30 डिसेंबरपासून टीमसोबत सराव करण्यासाठी उपलब्ध असेल. आयपीएल (IPL) स्पर्धेच्या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुरुवातीला निवड करण्यात आली नव्हती. बंगळुरुतील NCA मध्ये फिटनेस सिद्ध केल्यानंतर रोहित सिडनीमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील नियमानुसार तो सध्या 14 दिवसांचा क्वारन्टाइन कालावधी पूर्ण करत आहे. ‘सिडनीमधील परिस्थितीवर संपूर्ण लक्ष असून गरज पडली तर रोहितला सिडनीमधून लगेच बाहेर काढले जाईल’ असे बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. रोहित तिसऱ्या टेस्टमध्ये हनुमा विहारीच्या (Hanuma Vihari) जागी खेळण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published: