मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची कमाल, गावसकर, तेंडुलकर यांच्या क्लबमध्ये दाखल!

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची कमाल, गावसकर, तेंडुलकर यांच्या क्लबमध्ये दाखल!

 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) अर्धशतक झळकावलं. त्याचबरोबर तो दिग्गज बॅट्समन्सच्या गटात दाखल झाला आहे.

सिडनी, 11 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकासोबतचं  तो सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर या दिग्गज बॅट्समन्सच्या गटात दाखल झाला आहे.

पुजाराचा विक्रम

चेतेश्वर पुजारानं सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 176 बॉलमध्ये 50 रनची संयमी खेळी केली होती. हे त्याचं टेस्ट कारकीर्दीमधील सर्वात संथ अर्धशतक होतं. त्यानंतर भारतच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पुजारानं ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) शतकी भागिदारी केली.

अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला (Team India) पुजारा-पंत जोडीनं सावरलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 148 रनची भागिदारी केली. ऋषभ पंतनं आक्रमक खेळ केला. त्याचं शतक फक्त 3 रननं हुकलं. तर पुजारानं संयमी खेळ करत त्याला साथ दिली. पुजारानं त्याचं अर्धशतक 170 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं पूर्ण केलं.

या खेळीच्या दरम्यान पुजारानं टेस्ट क्रिकेटमध्ये 6 हजार रन पूर्ण केले. हा टप्पा पूर्ण करणारा तो 11 वा भारतीय बॅट्सनमन आहे. पुजारानं 134 इनिंगमध्ये जवळपास 48 च्या सरासरीनं 6 हजार रनचा टप्पा पूर्ण केला आहे.

हे वाचा-IND vs AUS: पिच खराब करताना स्मिथला रंगेहात पकडलं, पाहा VIDEO

सुनील गावसकर (117), विराट कोहली (119), सचिन तेंडुलकर (120), वीरेंद्र सेहवाग (123) आणि राहुल द्रविड (123) यांच्यानंतर सहा हजार रन वेगानं पूर्ण करणारा सहावा भारतीय आहे. पुजारा अखेर 77 रनवर आऊट झाला. त्याला जोश हेजलवुडनं आऊट केलं. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारानं मेलबर्न आणि सिडनीमध्ये शतक झळकावलं होतं. या दौऱ्यात त्याला अजून शतक झळकावता आलेलं नाही.

पंतची आक्रमक खेळी

पुजाराच्या संयमी खेळाप्रमाणेच ऋषभ पंतची आक्रमक खेळी हे पाचव्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. पंतनं  12 फोर आणि 3 सिक्सरच्या मदतीनं 118 बॉलमध्ये 97 रन काढले.  पंतला पहिल्या इनिंगमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर जिद्दीनं मैदानात उतरत त्यानं ही दमदार खेळी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Australia