मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: ब्रिस्बेनमधील हवामानामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर ‘पाणी’?

IND vs AUS: ब्रिस्बेनमधील हवामानामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर ‘पाणी’?

ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिस्बेन टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. तर भारताला ट्रॉफी कायम राखण्यासाठी फक्त ड्रॉ ची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिस्बेन टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. तर भारताला ट्रॉफी कायम राखण्यासाठी फक्त ड्रॉ ची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिस्बेन टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. तर भारताला ट्रॉफी कायम राखण्यासाठी फक्त ड्रॉ ची गरज आहे.

ब्रिस्बेन, 16 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australi) यांच्या ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची (Border-Gavaskar Trophy) चौथी आणि शेवटची टेस्ट सुरु आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकली होती. दुसरी टेस्ट भारतानं जिंकत मालिकेत पुनरागमन केलं. सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली. त्यामुळे सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. तर भारताला ट्रॉफी कायम राखण्यासाठी फक्त ड्रॉ ची गरज आहे. ब्रिस्बेनमधील हवामानामुळे ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे.

ब्रिस्बेनमध्ये पावसाची शक्यता

ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचं तिसरं सत्र पावसामुळे झालं नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तिसऱ्या दिवसाच्या खेळात देखील पावसाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चौथ्या आणि पाचव्या दिवसावर देखील पावसाचे काळे ढग आहेत. ऑस्ट्रेलिया ही टेस्ट जिंकण्यात अपयशी ठरला तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडंच राहील. भारतानं मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कांगारुंचा 2-1 असा पराभव करुन ही ट्रॉफी जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाकडं 307 रनची आघाडी!

ब्रिस्बेन टेस्टमध्ये पावसामुळे टी ब्रेक नंतर खेळ होऊ शकला नाही. त्यावेळी भारताची धावसंख्या 2 आऊट 62 होती. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 307 रननी पिछाडीवर आहे. तसंच त्यांच्या आठ विकेट्स बाकी आहेत. रोहित शर्मानं (Rohit Sharma) चांगला खेळ करत 74 बॉलमध्ये 44 रन काढले. त्याला एकाग्रता भंग होण्याची शिक्षा मिळाली. 100 वी टेस्ट खेळत असलेल्या नॅथन लायननं रोहितला आऊट केलं. पॅट कमिन्सनं शुभमन गिलला 7 रनवर आऊट केलं होतं.

ऑस्ट्रेलिया 369 वर ऑल ऑऊट

यापूर्वी भारताच्या नवोदीत बॉलर्सनं दुसऱ्या दिवशी सकाळी शिस्तबद्ध मारा केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या पाच विकेट्स सकाळच्या पहिल्याच सत्रात घेतल्या. शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 369 वर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियानं ब्रिस्बेन टेस्टमध्ये 350 पेक्षा जास्त रन केल्यानंतर आजवर एकही टेस्ट गमावलेली नाही.

First published:

Tags: Cricket, India vs Australia