मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ….तर ब्रिस्बेन टेस्ट खेळण्यासाठी टीम इंडिया तयार!

IND vs AUS : ….तर ब्रिस्बेन टेस्ट खेळण्यासाठी टीम इंडिया तयार!

 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी ब्रिस्बेनमध्ये  (Brisbane) होणार आहे. काही अटींवर टीम इंडिया (Team INdia) ब्रिस्बेनमध्ये टेस्ट खेळण्यासाठी तयार आहे, अशी माहिती आहे.

  • Published by:  News18 Desk

सिडनी, 10 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तिसरी टेस्ट सध्या सिडनीमध्ये (Sydney) सुरु आहे. या मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी ब्रिस्बेनमध्ये  (Brisbane) होणार आहे. ‘ब्रिस्बेनमधील कडक अटींमुळे टीम इंडिया तिथं टेस्ट खेळण्यास तयार नाही,’ अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. या बातमीनंतर नवा वाद निर्माण झाला. आता काही अटींवर टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये टेस्ट खेळण्यासाठी तयार आहे, अशी माहिती आहे.

काय आहे अट?

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ‘भारतानं ब्रिस्बेनमध्ये टेस्ट खेळण्यास किंवा तेथील नियमांचं पालन करण्यास कधीही मनाई केलेली नाही. क्रिकेटपटूंना हॉटेलमध्ये फिरण्याची परवानगी द्यावी ही बीसीसीआयची (BCCI) मागणी आहे. त्याचबरोबर टीम इंडियाची टेस्ट मॅच संपल्यानंतर तात्काळ भारतामध्ये रवानगी करण्यात यावी,’ अशी मागणी BCCI च्या अधिकाऱ्यांनी केली आहे. ब्रिस्बेन टेस्ट संपल्यानंतर शक्य असेल तर टीम इंडियाची त्याच दिवशी भारतामध्ये जाण्याची व्यवस्था करावी, अशी अट BCCI नं ठेवली आहे.

ऑस्ट्रेलियातून भारतामध्ये येण्यासाठी अजून कोणत्याही प्रकारचे बंधनं नाहीत. मात्र ब्रिस्बेनमधील परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागण्याची शक्यता BCCI नं व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय टीम दुबईमध्ये 14 दिवस क्वारंटाईन होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतरही टीम क्वारंटाईन होती. आता दौऱ्याच्या शेवटी ब्रिस्बेनमध्ये पुन्हा एकदा क्वारंटाईन राहण्याची टीमची तयारी नाही.

सध्या ब्रिटनहून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन आणि त्यानंतरचा एक आठवडा घरात क्वारंटाईन व्हावं लागत आहे. हा नियम टीम इंडियासाठीही लागू झाला, तर 5 फेब्रुवारीपासून सुरु होणारी भारत-इंग्लंड सीरिज प्रभावित होऊ शकते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम 12 जानेवारी रोजी ब्रिस्बेनमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना एक दिवस हॉटेलमधील रुममध्येच कडक बंधनात राहवं लागेल. व्हायरसचा प्रसार झाला तर लॉकडाऊन वाढवण्यास हयगय करणार नाही, असं स्थानिक सरकारनं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Cricket, India vs Australia