Home /News /sport /

IND vs AUS: '...त्यानंतर विराटची माफी मागितली', अजिंक्य रहाणेचा खुलासा

IND vs AUS: '...त्यानंतर विराटची माफी मागितली', अजिंक्य रहाणेचा खुलासा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टचे अजूनही पडसाद उमटत आहेत. त्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) चुकीमुळे विराट कोहली (Virat Kohli) रन आऊट झाला होता.

    मेलबर्न, 25 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टचे अजूनही पडसाद उमटत आहेत. अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाची दुसरी इनिंग 36 रन्सवरच संपुष्टात आली. भारताचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील हा निचांक होता. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया मोठा स्कोअर करेल असं वाटत होतं, सर्व काही सुरळीत सुरु असतानाच एका प्रसंगामुळे टीम इंडियाच्या इनिंगला ब्रेक लागला होता. पहिल्या इनिंगमध्ये काय झालं होतं? पहिल्या इनिंगमध्ये भारताचा 3 आऊट 188 असा चांगला स्कोअर होता. विराट कोहली 74 रन्सवर खेळत होता. तो पूर्ण रंगात होता. विराटची अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सोबत जोडी जमली होती. ही जोडी संपूर्ण दिवस खेळून काढेल असं वाटत असतानाच विराट आणि रहाणेमध्ये रन घेताना गफलत झाली. रहाणेच्या चुकीमुळे विराट रन आऊट झाला. भारताच्या नंतरच्या सहा विकेट्स फक्त 48 रन्समध्ये गेल्या आणि पहिली इनिंग 236 वर संपुष्टात आली. अजिंक्य रहाणेची ती चूक पहिल्या इनिंगंध्ये टर्निंग पॉईंट ठरली होती. रहाणेची पहिली प्रतिक्रिया अ‍ॅडलेड टेस्टनंतर विराट भारतामध्ये परतला असून उर्वरित सीरिजसाठी रहाणे कॅप्टन आहे. मेलबर्न टेस्टपूर्वी मीडियाशी बोलताना रहाणेनं त्या रन आऊट नंतर विराटशी काय बोलणं झालं हे जाहीर केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मी त्याच्याकडे (विराट) गेलो आणि त्याची माफी मागितली. मात्र, तो ती गोष्ट विसरला होता, असे रहाणेनं सांगितले. “त्यावेळी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, याची आम्हाला जाणीव होती. या प्रकारच्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात याची आम्हाला जाणीव आहे. हे सत्य स्विकारुनच तुम्हाला पुढं जायला हवं,’  असं रहाणे पुढे म्हणाला. अ‍ॅडलेड टेस्ट अडीच दिवसांमध्ये जिंकल्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ असल्याची कबुली रहाणेनं दिली. भारतीय टीममध्ये चार बदल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) ऐवजी शुभमन गिल (Shubhaman Gill), ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha)ऐवजी ऋषभ पंत (Rishabh Pant), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शमीऐवजी मोहम्मद सीरिज याची टीममध्ये निवड झाली आहे. पृथ्वी शॉ याला टीममधून डच्चू देण्यात आला आहे, तर शुभमन गिल ओपनिंगला खेळेल. गिल आणि सिराज यांचं हे टेस्ट क्रिकेटमधलं पदार्पण असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या