मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : जडेजानं रन आऊट केल्यानंतर रहाणेनं असं काही केलं की... पाहा PHOTO

IND vs AUS : जडेजानं रन आऊट केल्यानंतर रहाणेनं असं काही केलं की... पाहा PHOTO

रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) कव्हरच्या दिशेनं बॉल मारला आणि रन काढण्यासाठी कॉल केला. रहाणेनं (Ajinkya Rahane) त्याला प्रतिसाद दिला. तो रन काढण्यासाठी पळला, पण त्याचे प्रयत्न कमी पडले.

  • Published by:  News18 Desk

मेलबर्न, 28 डिसेंबर :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टवर कॅप्टन अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) छाप आहे. रहाणेनं पहिला दिवशी चांगली कॅप्टनसीनं  केली. दुसऱ्या दिवस बॅट्समन म्हणून गाजवला. रहाणे तिसऱ्या दिवशी सकाळी देखील निर्धारानं खेळत होता. तेंव्हा अचानक त्याला आऊट करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. रहाणे कोणत्या बॉलरच्या चांगल्या बॉलवर किंवा फिल्डरनं घेतलेल्या चांगल्या कॅचमुळे आऊट झाला नाही, तर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चुकीमुळे रन आऊट झाला.

रहाणेनं काय केलं?

भारताच्या इनिंगची 100 वी ओव्हर सुरु असताना रवींद्र जडेजानं कव्हरच्या दिशेनं बॉल मारला आणि रन काढण्यासाठी कॉल केला. रहाणेनं त्याला प्रतिसाद दिला. तो रन काढण्यासाठी पळला, पण त्याचे प्रयत्न कमी पडले. मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) च्या थ्रो वर टीम पेननं (Tim Paine) त्याला रन आऊट केले. रहाणे 223 बॉलमध्ये 112 रन काढून आऊट झाला. रहाणे-जडेजा जोडीनं सहाव्या विकेटसाठी 121 रन्सची पार्टरनरशिप केली.

रहाणे आपल्या चुकीमुळे रन आऊट झाला हे पाहतच रवींद्र जडेजा निराश झाला होता. रहाणेनं तातडीनं जडेजाच्या भावना ओळखल्या आणि त्याला दिलासा दिला. पहिल्या टेस्टमध्ये रहाणेच्या चुकीमुळे विराट कोहली (Virat Kohli) रन आऊट झाला होता. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये रहाणेनं विराटची माफी मागितली होती. यावेळी रहाणेनं स्वत:हूनच पुढाकार घेत जडेजाला दिलासा दिला. रहाणेच्या मनाच्या मोठेपणाला सर्वांनीच दाद दिली.  त्याचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

भारताकडं आघाडी

रहाणे आऊट झाल्यानंतर थोड्याच वेळात रवींद्र 57 रनवर आऊट झाला. त्याला मिचेल स्टार्कनं आऊट केलं. जडेजाची टेस्ट क्रिकेटमधील ही 15 वी हाफ सेंच्युरी होती. त्यापैकी दोन हाफ सेंच्युरी त्यानं ऑस्ट्रेलियात काढल्या आहेत.

भारताची संपूर्ण टीम 326 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 131 रन्सची आघाडी मिळाली आहे.

First published:

Tags: Cricket