मेलबर्न, 28 डिसेंबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सध्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) दुसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवसावर भारतीय बॉलर्सचं वर्चस्व होतं. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) ला आर. अश्विन (Ravichandran Ashwin) आऊट केलं. अश्विनच्या बॉलिंगवर कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) त्याचा कॅच घेतला. रहाणेनं कॅच घेताच रहाणे-अश्विन यांनी बॉलर-फिल्डर जोडीच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
कोणत्या क्लबमध्ये प्रवेश?
फिल्डर आणि बॉलरच्या जोडीनं एकत्र विकेट घेण्याच्या विशेष यादीमध्ये आता अश्विन-रहाणे जोडीनं प्रवेश केला आहे. या जोडीनं टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर 27 विकेट्स एकत्र घेतल्या आहेत. फिल्डर-बॉलर कॉम्बिनेशनमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या भारतीय यादीत राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) ही जोडी टॉपवर आहे.
सर्वात जास्त एकत्र विकेट्स घेणारी जोडी (भारत)
55 – राहुल द्रविड – अनिल कुंबळे
51- राहुल द्रविड – हरभजन सिंग
27 – अजिंक्य रहाणे – आर. अश्विन
26 – व्ही. व्ही. एस. लक्ष्मण – अनिल कुंबळे
25 - मोहम्मद अझहरुद्दीन – अनिल कुंबळे
अश्विननं टाकलं वकारला मागे
आर.अश्विन (R.Ashwin) याने मार्नस लाबुशेनची विकेट घेतली. याचसोबत अश्विनने पाकिस्तानी दिग्गज बॉलर वकार युनूस (Waqar Younis) याचा रेकॉर्ड मोडला आहे. अश्विनने लाबुशेनला आऊट करताच त्याने वकार युनूसला मागे टाकलं. वकारने टेस्ट क्रिकेटमध्ये 373 विकेट घेतल्या आहेत. अश्विनची ही 73 वी टेस्ट मॅच आहे, तर वकारने 87 टेस्ट मॅचमध्ये 373 विकेट घेतल्या होत्या.
अश्विन हा टेस्ट क्रिकेटमधला भारताचा चौथा यशस्वी बॉलर आहे. अनिल कुंबळे (619 विकेट), कपिल देव (434 विकेट), हरभजन सिंग (417 विकेट) यांनी अश्विनपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. मुरलीधरन याने टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन 20 व्या क्रमांकावर आहे.