ऑफ स्पिनर डोकेदुखी! स्टीव्ह स्मिथ स्पिन बॉलिंग चांगला खेळतो. या मालिकेत मात्र ऑफ स्पिनर त्याच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यानं या मालिकेत ऑफ स्पिनरच्या विरुद्ध 64 रन काढले. या दरम्यान तो चारदा आऊट झाला. या चारपैकी तीनदा त्याला आर. अश्विननं (R. Ashwin) आऊट केलं. ब्रिस्बेन टेस्टमध्ये अश्विन खराब फिटनेसमुळे खेळू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरनं त्याची कमतरता जाणवू दिली नाही. त्यानं स्मिथला अश्विनसारखीच बॉलिंग करत आऊट केलं आणि टेस्ट कारकीर्दीमधील पहिली विकेट घेतली. लाबुशेनचं शतक ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर 1 रनवर आऊट झाला. त्यानंतर मार्कस हॅरिसही पाच रन काढून परतला. त्यानंतर मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) नं चांगली बॅटिंग करत शतक झळकालं. तो 108 रन काढून नटराजनच्या बॉलिंगवर आऊट झाला.Sundar’s Maiden test wicket n its Smith 👏🏻#IndvAus #AusvInd #SteveSmith #Sundar pic.twitter.com/awEvRc4C2M
— ReadytogetBanned (@KirketVideos) January 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia