Home /News /sport /

20 जून 1974, 17 ओव्हर 77 मिनिटं, लॉर्ड्सच्या मैदानात काय झालं होतं?

20 जून 1974, 17 ओव्हर 77 मिनिटं, लॉर्ड्सच्या मैदानात काय झालं होतं?

भारतीय टीम (Team India) टेस्टमध्ये कधीही कोसळली की इंग्लंडविरुद्ध (England) 1974 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टच्या (Lords Test) आठवणी क्रिकेट फॅन्सना छळू लागतात.

    मुंबई, 19 डिसेंबर:  टीम इंडिया (Team India)  ऑस्ट्रेलियावर (Australia) मोठी आघाडी घेणार या अपेक्षेनं शनिवारी सकाळी क्रिकेट फॅन्स टीव्हीसमोर बसले होते. भारतीय टीमनं त्या सर्वांना एकापाठोपाठ एक असे मोठे धक्के दिले. एक विकेट गेल्याच्या धक्क्यातून फॅन्स सावरण्यापूर्वीच पुढची विकेट जात होती. भारताची बलाढ्य समजली जाणारी टॉप ऑर्डर (Top Order) पाहता-पाहता पत्त्यासारखी कोसळली. त्यानंतर तळाचे बॅट्समन काही तरी चमत्कार करतील ही आशा देखील फोल ठरली. भारताची दुसरी इनिंग  9 आऊट 36 वरच संपुष्टात आली. भारताची टेस्ट क्रिकेटमधील ही निचांकी धावसंख्या आहे. भारतीय टीम टेस्टमध्ये कधीही कोसळली की इंग्लंडविरुद्ध (England) 20 जून 1974 साली झालेल्या लॉर्ड्स टेस्टच्या (Lords Test) आठवणी क्रिकेट फॅन्सना छळू लागतात. लॉर्ड्सवर काय झाले होते? अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमचा न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांना त्यांच्या देशात पराभूत केल्यानं क्रिकेट विश्वात चांगलाच दबदबा वाढला होता. त्यामुळे 1974 साली इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. भारत-इंग्लंड मालिकेतील दुसरी टेस्ट लॉर्ड्सवर होती. इंग्लंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 629 रन्सचा डोंगर उभा केला. या मोठ्या स्कोअरला उत्तर देताना सुनील गावसकर आणि फारुक इंजिनिअर या जोडीनं पहिल्या इनिंगमध्ये चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 131 रन्सची पार्टरनरशिप केली. गावसकर यांचं अर्धशतक फक्त 1 रननं हुकलं ते 49 रनवर आऊट झाले. त्यानंतर भारतीय बॅट्समन ठरावीक अंतरानं आऊट होत गेले. फारुक इंजिनिअरनी सर्वात जास्त 86 रन्स काढले. भारताची पहिली इनिंग 302 रन्सवर संपुष्टात आली. त्यामुळे भारतीय टीमवर ‘फॉलो ऑन’ची नामुष्की ओढावली. दुसऱ्या इनिंगमध्ये गाठला तळ ‘फॉलो ऑन’ मिळाल्यानं निराश झालेल्या भारतीय फॅन्सना दिलासा देण्याची चांगली संधी भारतीय टीमला दुसऱ्या इनिंगमध्ये होते. त्यांनी त्याच्या बरोबर उलटा खेळ केला. पहिल्या इनिंगचा टॉप स्कोअरर फारुक इंजिनिअर यांना दुसऱ्या इनिंगमध्ये भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ अजित वाडेकर 3 रन काढून आऊट झाले. त्यानंतर भारतीय बॅट्समन्समध्ये आऊट होण्याची स्पर्धाच लागली. 5,0,3,5, 1 हा कोणता फोन नंबर नव्हता तर भारतीय टॉप ऑर्डरचे रन होते. मुंबईकर एकनाथ सोलकर हेच त्या इनिंगमध्ये दोन आकडी रन्स करु शकले. सोलकर हे 18 रन्सवर नाबाद राहिले. जेफ अरनॉल्ड आणि ख्रिस ओल्ड यांच्या बॉलिंगपुढे गावसकर, वाडेकर, विश्वनाथ या दिग्गजांचा भरणा असलेली भारतीय बॅटिंग अक्षरश: काहीही करु शकली नाही. अरनॉल्ड यांनी 4 तर ख्रिस ओल्ड यांनी 5 विकेट्स घेतल्या. भारताची दुसरी इनिंग फक्त 42 रन्सवर संपुष्टात आली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील भारताची ही निचांकी धावसंख्या होती. आता अ‍ॅडलेड छळणार! अजित वाडेकरच्या टीमचा 42 चा निचांक विराट कोहलीच्या टीमनं मोडला आहे. गेली 46 वर्ष लॉर्ड्समधील आठवणींनी भारतीय फॅन्सचा पिच्छा पुरवला. आता अ‍ॅडलेडच्या आठवणी त्यांना दीर्घ काळ छळणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या