मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : ‘ऑल राऊंडर’ जडेजाला या क्रमांकावर करायची आहे बॅटिंग!

IND vs AUS : ‘ऑल राऊंडर’ जडेजाला या क्रमांकावर करायची आहे बॅटिंग!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) कामगिरी भारतीय फॅन्सना दिलासा देणारी आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) कामगिरी भारतीय फॅन्सना दिलासा देणारी आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) कामगिरी भारतीय फॅन्सना दिलासा देणारी आहे.

सिडनी, 9 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) कामगिरी भारतीय फॅन्सना दिलासा देणारी आहे. जडेजानं या टेस्टमधील पहिल्या अडीच दिवसात उत्तम ‘ऑल राऊंडर’ ची (All Rounder)  भूमिका पार पाडली आहे. त्यानं सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या चार विकेट्स घेतल्या. स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) भन्नाट थ्रो करत रन आऊट केलं. त्यानंतर बॅटिंगमध्ये लोअर ऑर्डरसोबत एकाकी लढा देत नाबाद 28 रन्स काढले.

गेल्या काही दिवसांपासून जडेजाची बॅटिंग देखील टीमसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यानं मेलबर्न टेस्टमध्ये  57 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. यापूर्वी मर्यादीत ओव्हर्सच्या मालिकेतही त्यानं चांगली कामगिरी केली होती. जडेजाचं सध्या ‘ऑल राऊंड’ कामगिरी करण्याकडं लक्ष आहे.

काय म्हणाला जडेजा?

रविंद्र जडेजानं सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.“मी दोन्ही विभागात योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मला संधी मिळाली तेंव्हा मी योगदान दिलं आहे. भारताच्या बाहेर मला बॅटिंगची जास्त संधी मिळाली आहे.  जास्त विचार न करता  प्रत्येक संधीचा फायदा उठवण्याचा माझा प्रयत्न असतो,’’ असं जडेजानं स्पष्ट केलं आहे.

जडेजा या मालिकेत सातव्या क्रमांकावर बॅटिंग करत आहे. तो टॉप ऑर्डरमध्येही बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. “टॉप ऑर्डरमध्ये मी अधिक जबाबदारीनं बॅटिंग करतो. त्याचबरोबर टॉप ऑर्डरच्या बॅट्समनसोबत खेळल्यानं, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर योग्य प्रकारे योजना आखता येते. योजना तयार असेल तर इनिंग सावरण्यास वेळ मिळतो. मी टॉप ऑर्डरमध्ये खेळलो तर चांगलंच आहे,’’ असं जडेजानं सांगितलं. त्याचबरोबर “ मला ओपनिंग करायला हवी का?’’ असा मिश्किल प्रश्नही त्यानं यावेळी विचारला.

‘पिचकडून मदत नाही’

“‘दुसऱ्या दिवशी बॉलिंग करताना पिचकडून कोणतीही मदत मिळाली नाही. बॉलची गती आणि कोन बदलण्याची आमची योजना होती, असंही जडेजानं स्पष्ट केलं.

First published:

Tags: Cricket, India vs Australia