मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी, सिडनीच्या मैदानावर शिवीगाळ; टीम इंडियाकडून तक्रार दाखल

IND vs AUS: भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी, सिडनीच्या मैदानावर शिवीगाळ; टीम इंडियाकडून तक्रार दाखल

टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूना उद्देशून सिडनीच्या मैदानात (SCG) वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची टीम मॅनेजमेंटनं गंभीर दखल घेतली असून मॅच रेफ्रीकडं तक्रार केली आहे.

टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूना उद्देशून सिडनीच्या मैदानात (SCG) वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची टीम मॅनेजमेंटनं गंभीर दखल घेतली असून मॅच रेफ्रीकडं तक्रार केली आहे.

टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूना उद्देशून सिडनीच्या मैदानात (SCG) वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची टीम मॅनेजमेंटनं गंभीर दखल घेतली असून मॅच रेफ्रीकडं तक्रार केली आहे.

सिडनी, 9 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत एक मोठा वाद समोर आला आहे. टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूना उद्देशून सिडनीच्या मैदानात (SCG) वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची टीम मॅनेजमेंटनं गंभीर दखल घेतली असून मॅच रेफ्रीकडं तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?

या विषयावर समोर आलेल्या माहितीनुसार, सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. सिडनी टेस्ट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांनी त्यांना उद्देशून हे शब्द वापरले. सिराज आणि बुमराह यांना गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षक टार्गेट करत आहेत, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे सिडनीमध्ये सध्या केवळ 10 हजार प्रेक्षकांनाच मॅच पाहण्यासाठी परवानगी आहे.

(हे वाचा-IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन DRS घेताना चुकला, अंपायरवर भडकला!)

मॅच रेफ्रीकडं तक्रार

टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  यानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. बुमराह आणि सिराज यांनीही या विषयावर सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर टीम मॅनेजमेंटनं प्रकरणाची तक्रार सिडनी टेस्टचे रेफ्री डेव्हीड बून यांच्याकडं केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वाद सुरुच

भारतीय टीमच्या या दौऱ्यात हे पहिलंच वादग्रस्त प्रकरण नाही. टीम इंडियानं मेलबर्न टेस्ट जिंकल्यानंतर रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच खेळाडूंवर बायो बबल प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन नियमांवरही वाद सुरु आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार टीम इंडियाला ब्रिस्बेनमध्ये काही क्वारंटाईन नियमांमधून सुट हवी आहे. तेथील स्थानिक सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. ब्रिस्बेन टेस्टचा वाद कायम असतानाच सिडनी टेस्टमध्ये नवा वाद समोर आला आहे.

First published:

Tags: Cricket