सिडनी, 8 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) तिसरी टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) शतकामुळे ऑस्ट्रेलियात पहिल्या डावात 338 रन्स काढले आहेत. या मालिकेत खराब फॉर्ममध्ये असलेल्या स्मिथनं सिडनीमध्ये संयमी खेळी करत शतक झळकावलं. हे त्याच्या टेस्ट कारकीर्दीमधील 27 वं शतक आहे. या शतकासह स्मिथनं भारताचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) बरोबरी केली आहे.
सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे पूर्ण खेळ झाला नाही. पहिल्या दिवशी फक्त 55 ओव्हर्सचाच खेळ होऊ शकला. पावसाच्या अडथळ्यानंतरही क्रिकेट फॅन्सना काही मजेशीर क्षण अनुभवता आले. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) स्टीव्ह स्मिथची नक्कल केली. बुमराहच्या या मजेशीर कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
काय केलं बुमराहनं?
या व्हिडीओमध्ये स्मिथ एखादा फटका मारल्यावर जी कृती करतो त्याची बुमराह नक्कल करताना दिसत आहे. बुमराहच्या बॉलिंगवर स्मिथनं एक बचावात्मक फटका खेळला होता. त्यानंतर स्मिथनं सवयीप्रमाणे खांदे उडवले. स्मिथची ही कृती पाहून बुमराहला राहवलं नाही. त्यानंही स्मिथसारखी कृती केली. यावेळी बुमराह आणि त्याच्या जवळ उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजला हसू आवरलं नाही.
Hahaha @Jaspritbumrah93 reaction on Smith #AUSvIND pic.twitter.com/vjgOMokAMn
— Jasprit Bumrah FC (@JBFC93) January 7, 2021
बुमराहला दोन विकेट्स
सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी बुमराहला यश मिळालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी कमबॅक करत दोन विकेट्स घेतल्या. बुमराहनं कॅमेरुन ग्रीन आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेन यांना आऊट केलं. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket