मेलबर्न, 28 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात कोणतीही मालिका असली की स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) खेळणार हा नियम झाला होता. भारताविरुद्धच्या (Team India) पहिल्या दोन वन-डे मध्ये (IND vs AUS ODI ) स्मिथनं शतक झळकावलं होतं. त्यामुळे भारताविरुद्ध सलग तीन वन-डेमध्ये शतक करण्याचा विक्रम स्मिथच्या नावावर नोंदवला होता. वन-डेमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या स्मिथचा टेस्ट सीरिजमध्ये मात्र फॉर्म हरपला आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगंध्ये स्मिथ फक्त 8 रन काढून आऊट झाला. जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) त्याला आऊट केलं. स्मिथ आऊट होताच त्याने एका लाजीरवाण्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Gee whiz - Jasprit Bumrah with the feather touch to dismiss Steve Smith! @hcltech | #AUSvIND pic.twitter.com/soi7Qrf4gs
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2020
सात वर्षांनंतर आली वेळ!
स्मिथ मेलबर्न टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला होता. त्यामुळे मेलबर्न टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये मिळून स्मिथनं फक्त 8 रन केले आहेत. यापूर्वी स्मिथनं सर्वात कमी रन 2013 साली केले होते. इंग्लंड विरुद्ध 2013 साली लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये स्मिथ पहिल्या इनिंगमध्ये 2 तर दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 1 रन काढून आऊट झाला होता. सात वर्षांनी स्मिथ पहिल्यांदाच दोन्ही टेस्टमध्य्ये मिळून 10 रनच्या आत आऊट झाला आहे.
एका टेस्टमध्ये स्मिथचे सर्वात कमी रन (दोन्ही इनिंगमध्ये आऊट)
2 आणि 1 विरुद्ध इंग्लंड, लॉर्डस 2013
0 आणि 8 विरुद्ध भारत, मेलबर्न 2020
6 आणि 5 विरुद्ध इंग्लंड, ट्रेंट ब्रिज 2015
5 आणि 7 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2018
भारताविरुद्ध अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही स्मिथला कमाल करता आली नव्हती. पहिल्या इनिंगमध्ये तो फक्त 1 रन काढून आऊट झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये तो एक रन काढून नाबाद होता.
2020 मध्ये अपयशी
स्टीव्ह स्मिथची ICC नं या दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू (ICC Men’s Test Cricketer of the Decade) या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्याने आजवर 74 टेस्टमध्ये 62.31 च्या सरासरीनं 7229 रन काढले आहेत. यावर्षी मात्र त्याला टेस्टमध्ये कमाल करता आलेली नाही. स्मिथनं यावर्षी तीन टेस्टमध्ये 18.25 च्या सरासरीनं 73 रन काढले. भारताविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये मिळून त्याने फक्त 10 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia