IND vs AUS : 4,9,2,0,4,0,8,0,4,1 हा मोबाईल नंबर नाही, टीम इंडियाचा स्कोअर आहे!

IND vs AUS : 4,9,2,0,4,0,8,0,4,1 हा मोबाईल नंबर नाही, टीम इंडियाचा स्कोअर आहे!

अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारतीय टीमनं (Team India) लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद केली. भारतीय टीमची इनिंग फक्त 36 रनवर संपुष्टात आली. भारताचा टेस्ट क्रिकेटमधील हा निचांकी स्कोअर आहे.

  • Share this:

अ‍ॅडलेड, 19 डिसेंबर :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारतीय टीमनं (Team India) लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद केली. भारतीय टीमची इनिंग फक्त 36 रनवर संपुष्टात आली. भारताची अवस्था 9 आऊट 36 अशी झाली असताना मोहम्मद शमीला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. भारताचा टेस्ट क्रिकेटमधील हा निचांकी स्कोअर आहे. यावेळी तब्बल 46 वर्ष जुना रेकॉर्ड भारताने शनिवारी मोडला. जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्यापुढे एकही भारतीय बॅट्समन दोन अंकी रन करु शकला नाही.

तीन जण शून्यावर आऊट

भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये 53 रन्सची आघाडी घेतली होती. त्यामुळे टीम इंडिया यजमान ऑस्ट्रेलियासमोर मोठे लक्ष्य उभा करेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियन बॉलर्समोर भारतीय बॅट्समन फक्त 128 बॉल्स (21.2 ओव्हर्स) टिकू शकले. पहिल्या इनिंगमध्ये दमदार खेळी करणारे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे शून्यावर परतले. कॅप्टन विराट कोहली चार रन काढून कमिन्स बॉलिंगवर ऑफ ड्राईव्ह मारण्याच्या नादात आऊट झाला. भारताकडून मयांक अग्रवालनं सर्वात जास्त 9 रन काढले.

थोडक्यात टळला ‘तो’ लाजिरवाणा विक्रम

भारतीय टीमची अवस्था एकवेळेस 8 आऊट 26 अशी होती. त्यावेळी टेस्ट क्रिकेटमधील सर्वात कमी 30 हा स्कोअर देखील टीम पार करणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. संपूर्ण इनिंगमध्ये एकाही बॅट्समनला दोन अंकी रन करता आले नाहीत, असं टेस्ट क्रिकेटच्या इतिहासाद फक्त दुसऱ्यांदा घडले आहे. यापूर्वी इंग्लंडच्या विरुद्ध 1924 साली झालेल्या टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एकाही बॅटसमनला दोन अंकी रन करता आले नव्हते.

Published by: News18 Desk
First published: December 19, 2020, 4:25 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या