Home /News /sport /

IND v AUS : जडेजाऐवजी चहलने टीममध्ये नसतानाही केली बॉलिंग, भारताला या नियमाचा मिळाला फायदा

IND v AUS : जडेजाऐवजी चहलने टीममध्ये नसतानाही केली बॉलिंग, भारताला या नियमाचा मिळाला फायदा

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्यातली पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडिया (Team India) ला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची पहिली इनिंग संपताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जखमी झाला. त्यामुळे तो उर्वरीत मॅच खेळणार नाही. त्याचा कन्कशन सबस्टिट्यूट (Concussion Substitute) म्हणून युजवेंद्र चहलनं फिल्डिंग केली.

पुढे वाचा ...
    कॅनबेरा, 4 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS)  यांच्यातली पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडिया (Team India) ला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची पहिली इनिंग संपताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जखमी झाला. त्यामुळे तो उर्वरीत मॅच खेळणार नाही. त्याचा कन्कशन सबस्टिट्यूट (Concussion Substitute)  म्हणून युजवेंद्र चहलनं फिल्डिंगसोबतच बॉलिंगही केली. T20 मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजा बॅटिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाच्या हेल्मेटवर बॉल लागला. हेल्मेटवर बॉल लागल्याने त्याच्या डोळ्याला अंधारी आली होती. तो काही वेळ खाली बसला. त्याने ती ओव्हर पूर्ण खेळून काढली. मात्र नंतर तो फिल्डिंगसाठी आला नाही. बीसीसीआयने (BCCI) ने जडेजाच्या दुखापतीबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सध्या जडेजावर उपचार करत आहे. त्यापूर्वी रवींद्र जडेजाने फटकेबाजी करत 23 बॉल्समध्ये 44 रन काढले. त्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळेच भारताला निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 161पर्यंत मजल मारता आली. भारताकडून के.एल. राहुलने सर्वात जास्त 51 रन्स केले. भारतीय टीममध्ये पाच बदल भारताने तिसरी वनडे जिंकल्यानंतर विराट टी-20 साठी टीममध्ये फार बदल करणार नाही, अशी अपेक्षा होती, पण त्याने तब्बल 5 खेळाडू बदलले. कोहलीने या मॅचसाठी टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, मनीष पांडे, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी यांना संधी दिली. सुंदर, मनिष आणि सॅमसन या दौऱ्यातली पहिलीच मॅच खेळत आहेत, तर नटराजन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. शमीला पहिल्या दोन वनडेमध्ये खेळवल्यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. त्या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरने उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या