Home /News /sport /

'विराटमध्ये रिचर्ड्स आणि पाँटिंग दिसतो', वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूनं केलं कौतुक

'विराटमध्ये रिचर्ड्स आणि पाँटिंग दिसतो', वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूनं केलं कौतुक

WTC फायनलमधील पराभवानंतरही माजी ऑल राऊंडर मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी विराट कोहलीचं (Virat Kohli) कौतुक करत तोच यापुढेही कॅप्टन राहावा असं मत व्यक्त केलं आहे.

    मुंबई, 26 जून : WTC फायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर टीका होत आहे. टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच  या प्रकारची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं सर्वच बाबतीत सरस खेळ करत टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. भारताच्या पराभवानंतरही माजी ऑल राऊंडर मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी विराट कोहलीचं कौतुक करत तोच यापुढेही कॅप्टन राहावा असं मत व्यक्त केलं आहे. 1983 साली भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये अमरनाथ यांचं मोठं योगदान होतं. त्यांनी विराटबद्दल सांगितले की, "विराट कोहलीसारखा खेळाडू संपूर्ण पिढीमध्ये एकच असतो. मी त्याच्यामध्ये विव्ह रिचर्ड्स (Viv Richards) आणि रिकी पाँटिंग (Ricky Ponting) या दोघांची झलक पाहतो. विराट एक महान खेळडू आणि खूप चांगला कॅप्टन आहे. आपल्याला भावुक होण्याची गरज नाही. आपल्या अपेक्षा खूप असतात. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपण कुणावर तरी सर्व चुकांचं खापर फोडण्याचा प्रयत्न करतो." अमरनाथ यांनी पुढे सांगितले की, "विराट निश्चितच चांगलं काम करत आहे. क्रिकेट पुढे सुरू राहणार आहे. मला विराटमध्ये रिचर्ड्स आणि पाँटिंग दिसतो. त्यावरुन तो किती चांगला बॅट्समन आहे, याचा तुम्ही अंदाज करू शकता.  क्रिकेटमधील अनुभवामुळे त्याचं प्रदर्शन सुधारत आहे. त्यानं कॅप्टन असणे आवश्यक आहे." कपिल देवच्या बॅगेत नेहमी शॅम्पेन असे...38 वर्षांनी सहकाऱ्याचा खुलासा ... म्हणून टीम इंडियाचा पराभव अमरनाथ यांनी यावेळी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव का झाला? याचं कारण देखील सांगितलं. "भारतीय टीम समतोल आहे. पण परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी सराव सामन्यांची आवश्यकता असते. माझ्या मते त्यांना फायनलच्या तयारीला फार वेळ मिळाला नाही. पण, न्यूझीलंडचं अभिनंदन. ते खरे विजेते आहेत." असे अमरनाथ यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या