विश्वास बसणार नाही; ऑस्ट्रेलियाचा संघ 10 धावांवर बाद झाला

विश्वास बसणार नाही; ऑस्ट्रेलियाचा संघ 10 धावांवर बाद झाला

खेळ कोणताही असे त्यात नवे विक्रम होतच असतात. क्रिकेट सारख्या खेळात तर रोज नवे नवे विक्रम होत असतात.

  • Share this:

सिडनी, 07 फेब्रुवारी: खेळ कोणताही असे त्यात नवे विक्रम होतच असतात. क्रिकेट सारख्या खेळात तर रोज नवे नवे विक्रम होत असतात. पण काही विक्रम असे असतात ज्यांची कधीच आठवण येऊ नये असे खेळाडूंना वाटत असते. होय असाच एक न आवडणारा विक्रम ऑस्ट्रेलियात झाला आहे आणि हा विक्रम होत असताना ज्या संघाचा पराभव झाला आहे, तो संघ हा विक्रम कधीच लक्षात ठेवणार नाही.

ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियात एक महिला क्रिकेट संघ 10 धावांवर बाद झाला. यातील सर्वाधिक धावा या कोणत्याही खेळाडूच्या नव्हत्या तर अतिरिक्त धावांच्या होत्या. एलिस स्प्रिंग्स येथे सुरु असलेल्या स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 10 धावात बाद झाला. न्यू साऊथ वेल्सने दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या केवळ एका खेळाडूला धावसंख्या करू दिली. दक्षिण ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फेबी मेंसेलने 4 धावा केल्या. त्यांच्या 10 फलंदाजांना एकही धाव करता आली नाही. न्यू साऊथ वेल्सने 6 धावा अतिरिक्त म्हणून दिल्या.

न्यू साऊथ वेल्सकडून रोक्सेने वान वीन याने दोन षटकात एक धाव देत 5 पाच विकेट घेतल्या. हा संपूर्ण सामना केवळ 62 चेंडूत संपला. न्यू साऊथ वेल्सने विजयासाठीच्या 11 धावा केवळ 15 चेंडूत पूर्ण केल्या.

SPECIAL REPORT :'खाप' पंचायत, अंगावर थुंकून विवाहितेच्या कुटुंबाला टाकले वाळीत

First published: February 7, 2019, 9:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading