World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

वर्ल्ड कप फायनलसाठी कुमार धर्मसेना आणि मारेयस ऐरामस या मैदानावरील पंचांनी 3 मोठ्या चुका केल्या. ज्याची किमत न्यूझीलंडला चुकवावी लागली

  • Share this:

लंडन, 15 जुलै: अखेर क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळाला. लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर सुपरओव्हरमध्ये पराभव करत पहिल्यांदा विजेतेपद मिळवले. वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील पंचांच्या अंपायरिंगवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. पंचांनी केलेल्या चुकामुळेच इंग्लंडला न्यूझीलंडवर विजय मिळवता आल्याचे बोलले जात आहे. वर्ल्ड कप फायनलसाठी कुमार धर्मसेना आणि मारेयस ऐरामस या मैदानावरील पंचांनी 3 मोठ्या चुका केल्या. ज्याची किमत न्यूझीलंडला चुकवावी लागली आणि त्यांची हातातून वर्ल्ड कप निसटला. 50 षटकात सामना टाय झाल्याने तो सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला आणि तेथे ही सामना पुन्हा टाय झाला पण इंग्लंडने अधिक चौकार मारले असल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले.

सचिनच भारी; या World Cupमध्येही मोडता आला नाही मास्टर ब्लास्टरचा विश्वविक्रम!

त्याआधी न्यूझीलंडच्या डावात तिसऱ्या षटकात हेनरी निकोल्सला धर्मसेना यांनी एलबीडब्ल्यूवर बाद दिले. पण रिव्यूमध्ये तो बाद नसल्याचे आढळले. कारण चेंडू विकेटच्या वरून जात होता. त्यानंतर 23व्या षटकात प्लंकेटचा चेंडू केन व्हिल्यमसनच्या बॅटला लागून विकेटकिपरच्या हातात गेला. पण धर्मसेना यांनी त्याला बाद दिले नाही. यावर इंग्लंडने रिव्यू घेतला आणि व्हिल्यमसन बाद झाला. पुढे 34व्या षटकात मारेयस ऐरामस यांनी मार्क वुडच्या चेंडूवर रॉस टेलर याला एलबीडब्ल्यूवर बाद दिले. पण रिप्लेमध्ये चेंडू विकेटच्या वरून जात होता. त्याआधी मार्टिन गुप्टिलने रिव्यू घेतल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे टेलरला मैदान सोडावे लागले.

सेमीफायनलमध्ये देखील धर्मसेने यांनी केली होती चुक

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सेमीफायनलमध्ये देखील धर्मसेना यांनी काही चुकीचे निर्णय दिले होते. 20व्या षटकात इंजेसन रॉय धर्मसेना यांनी बाद दिले होते. पण नंतर रिप्लेमध्ये रॉय बाद नसल्याचे आढळले. तेव्हा इंग्लंडकडे रिव्यू नसल्याने रॉयला मैदान सोडावे लागले आहे. धर्मसेनेच्या या निर्णयावर रॉयने वाद घातला त्यामुळे त्याला डिमेरिट गुण देखील देण्यात आले आणि 30 टक्के दंड लावण्यात आला.

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

First published: July 15, 2019, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading