INDvsNZ : मोठ्या सामन्यात अपयशी ठरतो विराट? जाणून घ्या सत्य!

INDvsNZ : मोठ्या सामन्यात अपयशी ठरतो विराट? जाणून घ्या सत्य!

नॉकआऊट सारख्या फेरीत विराट खराब कामगिरी करतो अशी टीका आता त्याच्यावर होऊ लागली आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 11 जुलै: ICC Cricket World Cupमधील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या चुकांवर बोलले जात आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात दोन दिवस खेळलेल्या या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताला 240 धावांचे आव्हान दिले होते. अंतिम फेरीचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे आघाडीचे 4 फलंदाज अवघ्या 24 धावात बाद झाले होते. भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आघाडीची फळी अपयशी ठरली. ओपनर के.एल.राहुल आणि रोहित शर्मा केवळ 1-1 धावा घेऊन बाद झाले. तर कर्णधार विराट कोहली देखील अपयशी ठरला. वनडे क्रिकेटमध्ये शतकांवर शतक करणाऱ्या विराटला केवळ एकच धाव करता आली. नॉकआऊट सारख्या फेरीत विराट खराब कामगिरी करतो अशी टीका आता त्याच्यावर होऊ लागली आहे.

काय आहे सत्य

विराटचा हा तिसरा वर्ल्ड कप आहे. याआधी त्याने 2011 आणि 2015चा वर्ल्ड कप खेळला आहे. भारतीय संघाकडून खेळताना विराटने आतापर्यंत 5 नॉकआऊट सामने खेळले आहेत. या 5 सामन्यातील विराटच्या खेळीकडे नजर टाकल्यास धक्कादाय चित्र समोर येते. नॉकआऊटमधील 5 सामन्यात विराटने 14.40च्या सरासरीने केवळ 72 धावा केल्या आहेत. त्यापैकी केवळ एकच सामन्यात 30 हून अधिक धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमधील 3 सेमीफायनल सामन्यात विराटने 3.67च्या सरासरीने 11 धावा केल्या आहेत. 2011मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना तो 9 धावांवर बाद झाला होता. 2015मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना आणि आता न्यूझीलंडविरुद्ध खेळताना एकच धाव त्याला करता आली.

विराटच्या नॉकआऊट फेरीतील या कामगिरीमुळे मोठ्या सामन्यात त्याची फलंदाजी अपयशी ठरले किंवा त्याला धावसंख्या करता येत नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पंतने केल्या अधिक धावा

रोहित, राहुल, विराट आणि दिनेश हे आघाडीचे चारही फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर पंतने एका बाजूने भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने 56 चेंडूत 32 धावा केल्या. विराटने वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या आतापर्यंतच्या 3 सेमीफायनल सामन्यात जितक्या धावा केल्या आहेत, त्यापेक्षा अधिक धावा पंतने एकाच सामन्यात केल्या आहेत. कोहलीला वर्ल्ड कपच्या 3 सामन्यात 11 धावा करता आल्या आहेत.

VIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला

First published: July 11, 2019, 8:19 AM IST

ताज्या बातम्या