रोहित शर्मा माझी पत्नी नाही, 'त्या' प्रश्नावर धवनचे उत्तर

रोहित शर्मा माझी पत्नी नाही, 'त्या' प्रश्नावर धवनचे उत्तर

30 मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिखर धवनने उत्तर दिलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : आयपीएलनंतर क्रिडा विश्वाचे लक्ष आता आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेकडे लागले आहे. आयपीएलमध्ये एकमेकांविरोधात खेळलेले खेळाडू आता एकाच संघातून खेळतील. भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना चांगली भागिदारी करावी लागेल.

आयपीएलमध्ये धवन दिल्ली कॅपिटल्सकडून तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. यात धवनने दिल्लीच्या संघात खेळताना पृथ्वी शॉसोबत सलामीला फलंदाजी केली. त्याबाबत शिखऱ धवनला प्रश्न विचारण्यात आला की, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहितसोबत नेहमी बोलतोस का? यावर धवनने रोहित शर्मा माझी पत्नी नाही की मी त्याच्याशी नेहमी बोलत बसू. बोलून काय होणार आहे असंही तो म्हणाला.

शिखर धवनने सांगितले की, एखाद्यासोबत तुम्ही काही वर्ष खेळता तेव्हा त्याला समजून घेतलेलं असतं. रोहित सोबत विशेष चर्चेची गरज नाही. पृथ्वीसोबत फलंदाजी करतानसुद्धा हेच करतो. जेव्हा मैदानावर एक खेळाडू फटकेबाजी करत असेल तर दुसऱ्याने त्याला साथ दिली पाहिजे असंही त्याने सांगितलं.

मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत खेळताना असलेल्या दबावाबद्दल धवन म्हणाला की, आम्ही दररोज खेळतो. त्यामुळे कधी धावा होतात तर कधी नाही. अशावेळी शांत राहतो आणि वाचर करतो की कोणत्या गोष्टी कमी पडल्या. त्यानंतर पुन्हा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. जास्त टेन्शन घेण्यावर माझा विश्वास नसल्याचं शिखर धवनने सांगितलं.

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर'मुळे अशोक चव्हाणांचा गड राहणार का अभेद्य?

First published: May 15, 2019, 8:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading