वर्ल्ड कप संघात नाही तर आता पंत जाणार वेस्ट इंडिजला

वर्ल्ड कप संघात नाही तर आता पंत जाणार वेस्ट इंडिजला

30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रिषभ पंतची भारतीय संघात निवड झाली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात रिषभ पंतला स्थान मिळालं नाही. मात्र आता त्याची वेस्ट इंडिज ए दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड झाली आहे. भारताच्या ए संघातून तो 11 जुलैला सुरु होणाऱ्या मालिकेत खेळणार आहे. पाच एकदिवसीय आणि तीन चार दिवसीय सामने खेळले जाणार आहेत. या संघात वृद्धिमान साहाचीसुद्धा वेस्ट इंडिज दौऱ्यावर निवड झाली आहे.

वृद्धिमान साहा भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे. खांद्याच्या दुखापतीने तो संघातून बाहेर राहिला. गेल्याच वर्षी त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बंगालकडून त्याने पुनरागमन केलं. आयपीएलमध्येही त्याने पाच सामन्यात हैदराबादचे प्रतिनिधीत्व केलं आहे. दरम्यान, पंतने स्वत:चे स्थान निर्माण केलं.

वेस्ट इंडिजविरुद्ध चार दिवसीय सामन्याची मालिका 24 जुलैला सुरु होणार आहे. त्यापूर्वी 11 जुलैला 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. भारतीय संघाच्या दौऱ्याआधी ए संघाचा दौरा होणार आहे. यात पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांचीही निवड झाली आहे. तसेच श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे हेसुद्धा भारत ए मध्ये खेळणार आहेत.

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि उमेश यादव यांची निवड ए संघात झाली नाही. हे खेळाडू काउंटी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कप दरम्यान श्रीलंका ए संघाविरुद्ध मालिका खेळली जाणार आहे. यासाठी भारत ए संघाची घोषणा केली आहे.

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर'मुळे अशोक चव्हाणांचा गड राहणार का अभेद्य?

First published: May 15, 2019, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading