World Cup : इंग्लंडच्या संघात KKR चा खेळाडू इन तर राजस्थानचा आऊट

World Cup : इंग्लंडच्या संघात KKR चा खेळाडू इन तर राजस्थानचा आऊट

इंग्लंडने राजस्थानकडून खेळणाऱ्या या खेळाडूला संघात न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • Share this:

लंडन, 17 एप्रिल : आय़सीसी क्रिकेट वर्ल्डकपचे यजमानपद भूषवणाऱ्या इंग्लंडने त्यांचा संघ जाहीर केला आहे. यात इंग्लंडने जोफ्रा आर्चरला संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत असलेल्या जोफ्रा आर्चरची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तर यंदाच्या आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या टॉम करनची या संघात वर्णी लागली आहे.

30 मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियानंतर भारताने संघ जाहीर केले आहेत. भारताने 2015 च्या वर्ल्डकपमधील 7 खेळाडूंना दुसऱ्यांदा संधी दिली आहे तर 8 नव्या खेळाडूंना संघात घेतले आहे. पर्यायी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतऐवजी निवड समितीने दिनेश कार्तिकला प्राधान्य दिले आहे.

इंग्लंडचा संघ : जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स, टॉम करन, जो डेनली, डेविड विली

वाचा - World Cup : भारतीय संघातले 'हे' हिरो शाळेत मात्र झिरो

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

ऑस्ट्रेलियाचा संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार) उस्मान ख्वाजा, जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा

VIDEO : प्रियांका गांधीबद्दल उमा भारतींचं वादग्रस्त वक्तव्य

First published: April 17, 2019, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading