'हिटमॅन' रोहितकडे World Cupमधील सर्वात मोठा विक्रम करण्याची गोल्डन संधी!

'हिटमॅन' रोहितकडे World Cupमधील सर्वात मोठा विक्रम करण्याची गोल्डन संधी!

world cupमधील श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.

  • Share this:

लीड्स, 06 जुलै: icc world cup 2019मध्ये 500 हून अधिक धावा, 4 शतके, 90पेक्षा अधिकची सरासरी आणि 100च्या जवळपास स्ट्राइक रेट भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याची ही कामगिरी आहे. वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताची लढत श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. स्पर्धेत भारताने सेमीफेयनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या सामन्यातील पराभवामुळे भारताचे फार नुकसान होणार नाही पण विजय मिळवल्यास गुणतक्त्यात भारताला अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. या उलट श्रीलंकेसाठी हा सामना केवळ औपचारीकता आहे. लंकेने 8 पैकी प्रत्येकी 3 सामन्यात विजय आणि पराभव स्विकारला आहे. त्यांचे 8 गुण आहेत. त्यामुळे भारताविरुद्धचा सामना हा लंकेसाठी सराव सामना पुरताच महत्त्वाचा आहे. पण लंकेविरुद्धच्या या सामन्यात सर्वात मोठी संधी आहे ती भारताच्या रोहित शर्मा याला विक्रम करण्याची...

एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकाराने 2015च्या वर्ल्ड कपमध्ये 4 शतके झळकावली होती. यावेळी रोहित शर्माने देखील 4 शतके केली आहेत. स्पर्धेत भारताचे आणखी दोन सामने निश्चित होणार आहेत. त्यापैकी पहिला सामना आज लंकेविरुद्ध तर दुसरा सामना हा सेमीफायनमध्ये होणार आहे. रोहित शर्माने आज श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली तर संगकाराचा विक्रम रोहितच्या नावावर जमा होऊ शकतो. हा विक्रम मोडण्यासाठी रोहित कमीत कमी दोन सामने आहेत. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर रोहितला हा विक्रम करण्याची आणखी म्हणजे तीन संधी मिळतील.

सचिनचा विक्रम मोडण्याची संधी

वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये 6 शतके केली आहेत. सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी रोहितला केवळ दोन शतकांची गरज आहे. रोहितने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 5 शतके केली आहेत. संगकाराच्या नावावर देखील तितकीच शतके आहेत.

2019मध्ये रोहित ठरला 'हिट'

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत 544 धावा केल्या आहेत. यात 4 शतकांचा देखील समावेश आहे. गेल्या 2 सामन्यात दोन शतके झळकावली आहेत. रोहितने इंग्लंडविरुद्ध 102 आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्ध 104 धावा केल्या होत्या. याआधी रोहितने श्रीलंकेविरुद्ध द्विशतक केले आहे. त्यामुळे त्याला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे.

VIDEO: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 6, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading