...तर पाकिस्तानविरुद्ध ICC वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही- BCCI

...तर पाकिस्तानविरुद्ध ICC वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही- BCCI

इंग्लंडमध्ये मे महिन्यात होणाऱ्या ICC वर्ल्डकप स्पर्धेत कदाचित भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: इंग्लंडमध्ये मे महिन्यात होणाऱ्या ICC वर्ल्डकप स्पर्धेत कदाचित भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबत सामना खेळायचा की नाही याबाबत सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मान्य असेल. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास उत्सुक नाही. केंद्राच्या या निर्णयाला बीसीसीआयने पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

वाचा-वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर काय होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याने केंद्र सरकारने दोन्ही देशातील क्रिकेटचे सामने खेळण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे हे दोन्ही देश केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांच्या विरुद्ध लढतात. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास नकार दिला होता. पण पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध आणखी तणावाचे झाले आहेत. यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही याचा निर्णय होण्यास आणखी काही काळ जावा लागेल. या निर्णयाचा ICCशी काही संबंध नाही. वर्ल्ड स्पर्धेच्या वेळी सरकारने सांगितले की,  भारतीय संघाने पाकिस्तान सोबत खेळू नये तर आम्ही खेळणार नाही.

भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळला नाही तर काय होईल

ICC वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही तर त्या सामन्याचे गुण त्यांना मिळतील. जर पाकिस्तान आणि भारत यांच्यात जेतेपदासाठी सामना झाला तरी आम्ही खेळणार नाही. अशा परिस्थितीत लढत न होता पाकिस्तान वर्ल्डकप जिंकेल, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. याबाबत आम्ही अद्याप ICCशी चर्चा केली नाही असेही बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.


VIDEO : भारत Vs पाकिस्तान, कुणाची किती ताकद!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 11:55 AM IST

ताज्या बातम्या