मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Women's World Cup : टीम इंडियाला मोठा धक्का, स्मृती मंधाना जखमी! तातडीनं सोडलं मैदान

Women's World Cup : टीम इंडियाला मोठा धक्का, स्मृती मंधाना जखमी! तातडीनं सोडलं मैदान

महिला वर्ल्ड कप स्पर्धेचं (ICC women cricket world cup) काऊंट डाऊन सुरू झालं आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

    मुंबई, 27 फेब्रुवारी : महिला वर्ल्ड कप स्पर्धेचं (ICC women cricket world cup) काऊंट डाऊन सुरू झालं आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या वॉर्म अप मॅचमध्ये अनुभवी बॅटर स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) डोक्याला बाऊन्सर लागला. त्यानंतर तिनं तातडीनं मैदान सोडलं. रविवारच्या वॉर्म अप मॅचमध्ये सुरूवातीलाच हा प्रकार घडला. दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माइलचा बाऊन्सर लागल्यानं स्मृती जखमी झाली. त्यावेळी ती 12 रन काढून खेळत होती. बाऊन्सर लागल्यानंतर मेडिकल टीमनं स्मृतीची तपासणी केली आणि ती बॅटींग करण्यासाठी फिट असल्याचं जाहीर केलं. पण, स्मृतीनं त्यानंतर आणखी एकदा चर्चा करत मैदान सोडले. डोक्याला बॉल लागल्यानं तिला मोठा धक्का बसला होता. मेडिकल स्टाफनं दिलेल्या माहितीनुसार स्मृती मंधानामध्ये कनकशनची कोणतीही समस्या आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून तिने मैदान सोडले. या मॅचमध्ये भारतानं पहिल्यांदा बॅटींग करत 9 आऊट 244 रन केले. भारताकडून हरनप्रीत कौरनं शतक झळकावलं. IND vs SL : टीम इंडियाचा खेळाडू अंपायरपेक्षा फास्ट, लगेच दिला निर्णय! Video Viral हरमननं 114 बॉलमध्ये 103 रनची खेळी केली. गेल्या काही दिवसांमध्ये खराब फॉर्ममुळे हरमननवर टीका होत होती. तिच्या टीममधील जागेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. न्यूझीलंड विरूद्धच्या शेवटच्या वन-डेमध्ये तिने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर वॉर्मअप मॅचमध्ये शतक झळकावत आपण, फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत हरमननं दिले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ही चांगली बातमी आहे. भारताची कॅप्टन मिताली राज या मॅचमध्ये अपयशी ठरली. ती शून्यावर आऊट झाली. यास्तिका भाटियानं 58 रनची खेळी केली. याशिवाय ऋचा घोष (11), स्नेह राणा (14) आणि पूजा वस्त्रकार (16) यांनीच दोन अंकी रन केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, South africa, Team india

    पुढील बातम्या