ICC Test Ranking : ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला ‘या’ बॅट्समननं टाकलं मागे

ICC Test Ranking :  ब्रिस्बेनचा हिरो ऋषभ पंतची मोठी झेप, कोहलीला ‘या’ बॅट्समननं टाकलं मागे

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) मोठी सुधारणा झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Ranking) मोठी सुधारणा झाली आहे. नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत पंतनं भारताकडून सर्वात जास्त रन काढले होते. ब्रिस्बेन टेस्टमधील त्याच्या नाबाद 89 रन मुळेच भारतानं ब्रिस्बेन टेस्ट जिंकली होती.

पंतची मोठी झेप

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या रँकिंगनुसार ऋषभ पंत आता 13 व्या क्रमांकावर पोहचला असून त्याला 13 क्रमांकाचाच फायदा झाला आहे. विकेट किपर बॅट्समनमध्ये पंत सध्या नंबर 1 आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन क्विंटन डी कॉकला पंतनं मागं टाकलंय. डी कॉक सध्या 15 व्या नंबरवर आहे.

गिललाही फायदा

ब्रिस्बेन टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 91 रन्सची खेळी करणाऱ्या शुभमन गिलच्या  (Shubhman Gill) रँकिंगमध्ये 21 नं सुधारणा झाली आहे. गिल आता 47 व्या क्रमांकावर आहे. गिलनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये 52 च्या सरारीनं 259 रन केले होते.

कोहलीचं नुकसान, पुजाराला फायदा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या सुट्टीवर (Paternity leave) आहे. विराटला क्रिकेट न खेळण्याचा फटका बसलाय. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं  (Marnus Labuschane) विराटला मागं टाकलंय. नव्या रँकिंगनुसार लाबुशेन तिसऱ्या तर विराट चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा पहिला तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा दुसरा क्रमांक कायम आहे.

भारताच्या चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) रँकिंगमध्ये एकनं वाढ झाली असून पुजारा आता सातव्या क्रमांकावर आला आहे.

अश्विन, बुमराहला फायदा

ब्रिस्बेन टेस्ट न खेळताही आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना फायदा झाला आहे. ते अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. बॉलर्सच्या यादीत पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड चौथ्या क्रमांकावर आहे.

Published by: News18 Desk
First published: January 20, 2021, 4:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या