IND vs AUS: भारताच्या मोठ्या पराभवानंतरही विराट कोहलीला फायदा!

IND vs AUS: भारताच्या मोठ्या पराभवानंतरही विराट कोहलीला फायदा!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (Team India) आठ विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. त्याचवेळी विराट कोहलीला (Virat Kohli) या टेस्टनंतर एक वैयक्तिक फायदा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (Team India) आठ विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. त्यापूर्वी भारताची पहिली इनिंग फक्त 36 रन्सवर संपुष्टात आली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील भारताची ही निचांकी धावसंख्या आहे. या पराभवामुळे चार टेस्टच्या मालिकेत भारतीय टीम 0-1 ने पिछाडीवर पडली आहे. ज्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली भारताची ही सर्व मानहानी झाली त्या कॅप्टनला म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli) या टेस्टनंतर एक वैयक्तिक फायदा झाला आहे.

काय झाला विराटचा फायदा?

अ‍ॅडलेड टेस्टनंतर आयसीसीने (ICC) टेस्ट क्रिकेटमधील नवी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहली आणि स्मिथमधील अंतर आता कमी झाले आहे.

विराटनं पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे विराटचे टेस्ट रँकिंगमधील दोन पॉईंट वाढले आहेत. विराटचे टेस्ट रँकिंगमध्ये आता 888 पॉईंट झाले आहेत. तर पहिल्या टेस्टमध्ये फार कमाल करु न शकणाऱ्या स्मिथचे 10 पॉईंट्स कमी झाले आहेत. यामुळे आता विराट आणि स्मिथ यांच्यात 13 पॉईंट्सचे अंतर आहे. या टेस्टपूर्वी दोघांमध्ये 25 पॉईंट्सचे अंतर होते.

अश्विनचा फायदा, बुमराहला फटका

अ‍ॅडलेड टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये शानदार बॉलिंग करत 5 विकेट्स घेणारा भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) बॉलर्सच्या यादीत तो आता नवव्या क्रमांकावर आहे. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मात्र टॉप टेनमधून बाहेर गेला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनाही या टेस्टचा मोठा फायदा झाला. जोश हेजलवुडने चार क्रमांकाची झेप घेत ‘टॉप फाईव्ह’मध्ये प्रवेश केला आहे. तर पॅट कमिन्सचेही आणखी सहा पॉईंट्स वाढले असून त्याचे आता एकूण 910 पॉईंट्स झाले आहेत. टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडवर कमिन्सची आता 65 पॉईंट्सची भक्कम आघाडी आहे.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 4:50 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या