मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC Test Ranking: सलग पाचव्या वर्षी टीम इंडिया ऑन टॉप, न्यूझीलंडचा धोका वाढला!

ICC Test Ranking: सलग पाचव्या वर्षी टीम इंडिया ऑन टॉप, न्यूझीलंडचा धोका वाढला!

टीम इंडियानं (Team India) आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (Test Ranking) नंबर 1 चं स्थान कायम राखलं आहे. सलग 5 व्या वर्षी टीम इंडियानं नंबर 1 वर आहे.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 13 मे: टीम इंडियानं (Team India) आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (Test Ranking) नंबर 1 चं स्थान कायम राखलं आहे. सलग 5 व्या वर्षी टीम इंडियानं नंबर 1 वर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकल्याचा फायदा टीम इंडियाला झालाय. आयसीसीनं वार्षिक टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडिया 121 पॉईंट्ससह नंबर 1 वर आहे. टीम इंडियानं गेल्या सहा महिन्यात सलग दोन टेस्ट सीरिज जिंकल्या आहेत. भारतीय क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला 2-1 नं पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडवर 3-1 असा विजय मिळवला.

आयसीसीच्या नव्या रँकिंगनुसार टीम इंडियाला केन विल्यमसनच्या (Kane Williamson) न्यूझीलंडनं आव्हान निर्माण केलं आहे. न्यूझीलंडची टीम सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा भारतापेक्षा फक्त 1 पॉईट कमी आहे. न्यूझीलंडनं वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला आहे. त्याचा फायदा त्यांना झाला.

इंग्लंडच्या टीमला या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झालाय. इंग्लंड 109 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारताविरुद्धची सीरिज गमावल्यानं ऑस्ट्रेलियन टीम चौथ्या क्रमांकावर घसरली आहे.

पाकिस्तानची टीम 94 पॉईंट्ससह पाचव्या तर वेस्ट इंडिजची टीम 84 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेची टीम सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अनुक्रमे 80 आणि 78 पॉईंट्स आहेत. वेस्ट इंडिजची टीम यापूर्वी आठव्या क्रमांकावर होती. त्यांना दोन क्रमांकाचा फायदा झाला आहे. 2013 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा टॉप 6 मध्ये समावेश झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बदलणार! टीम पेननं दिला 'या' खेळाडूला पाठिंबा

वेस्ट इंडिजनं बांगलादेशचा 2-0 नं पराभव केला. तर श्रीलंकेविरुद्धची सीरिज ड्रॉ झाली होती. बांगलादेशची टीम 46 पॉईंट्ससह 9 व्या तर झिम्बाब्वेची टीम 35 पॉईंट्ससह 10 व्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Cricket news, Icc, New zealand, Team india