ICC Test Ranking: इंग्लंडविरुद्ध चांगल्या खेळाचा रोहितला फायदा, ‘हिटमॅन’ची सर्वात मोठी झेप

ICC Test Ranking: इंग्लंडविरुद्ध चांगल्या खेळाचा रोहितला फायदा, ‘हिटमॅन’ची सर्वात मोठी झेप

भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्टमधील चांगल्या खेळाचा फायदा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्टमधील चांगल्या खेळाचा फायदा झाला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या टेस्ट मॅचवर स्पिन बॉलर्सचं वर्चस्व होतं. दोन दिवसात संपलेल्या या टेस्टमध्ये रोहित शर्मानं सर्वात जास्त रन केले होते. त्यामुळे आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) रोहितनं टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर त्याच्या टेस्ट करियरमधील सर्वोत्तम क्रमांकही मिळवला आहे.

रोहित शर्मानं अहमदाबादमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये (Day-Night Test) पहिल्या इनिंगमध्ये 66 तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 25 रन काढले होते. या खेळीमुळे रोहितनं 14 व्या क्रमांकावरुन 8 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. यापूर्वी दुसऱ्या टेस्टमध्ये शतक झळकावल्यानंतर रोहितनं 19 व्या क्रमांकावरुन 14 व्या क्रमांकावर झेप घेतली होती. रोहितनं त्याच्या टेस्ट करियरमध्ये दुसऱ्यांदा टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे.

टेस्ट रँकिंगमधील टॉप टेन बॅट्समनमध्ये भारताच्या तिघांचा समावेश आहे. रोहित शर्मासह विराट कोहली (Virat Kohli) 836 पॉईंट्सह पाचव्या, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 708 पॉईंट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे. विराटच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झाला नसला तरी पुजाराचं रँकिंग या आठवड्यात दोन क्रमांकांनी घसरलं आहे.

(वाचा - ‘एवढी सुंदर पत्नी असूनही डिप्रेशन कसं येतं?’ माजी क्रिकेटपटूचा विराटला सवाल)

India opener Rohit Sharma storms into the top 10 to a career-best eighth position in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting 💥

Full list: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/Hqb9uTWnzJ

— ICC (@ICC) February 28, 2021

आर. अश्विनची घौडदौड सुरुच

भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R. Ashwin) घौडदौड सुरुच आहे. अश्विननं बॉलर्सच्या रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) रँकिंगमध्ये एक क्रमांकाची घसरण झाली असून तो आठव्या वरुन नवव्या क्रमांकावर गेला आहे.

🔸 Ashwin breaks into top three

🔸 Anderson slips to No.6

🔸 Broad, Bumrah move down one spot

The latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for bowling: https://t.co/AIR0KNm9PD pic.twitter.com/FssvpYiLcx

— ICC (@ICC) February 28, 2021

बॅट्समन आणि बॉलर्सच्या नंबर एकमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. या दोन्ही रँकिंगमध्ये अनुक्रमे केन विल्यमसन आणि पॅट कमिन्स नंबर 1 वर कायम आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 3:30 PM IST

ताज्या बातम्या