रोहित शर्माला आजवर नेहमीच वन-डे आणि टी-20 प्रकारातील बॅट्समन समजले गेले आहे. पण त्याने गेल्या काही महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने चेन्नईत शतक झळकावले होते. तसंच लॉर्ड्स टेस्टमध्ये पहिल्या इनिंगंध्ये 83 रनची खेळी केली होती. या कामगिरीमुळे रोहितची रँकिंग सुधारले आहे. आता रोहितनं विराटला मागं टाकल्यास त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील तंत्रावर प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांची तोंड बंद होतील. IPL 2021: महेंद्रसिंह धोनीची वाढणार शक्ती, धोकादायक खेळाडूचं टीममध्ये पुनरागमन तर दुसरिकडं, मागच्या 21 महिन्यांपासून विराटची बॅट शांत आहे. या दरम्यान टेस्ट, वनडे आणि टी-20 च्या एकूण 49 इनिंगमध्ये विराटला एकही शतक करता आलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही विराटला मोठी खेळी करता आली नाही. विराटने दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 42 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये 20 रन केले. कोहलीने अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध केलं होतं. यानंतर 21 महिने झाले तरी त्याला एकही शतक करता आलं नाही.↗️ Joe Root rises to No.2 ↗️ Babar Azam moves up two spots
The latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings for batting 👇 🔗 https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/ERYzCGm9Pc — ICC (@ICC) August 18, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Rohit sharma, Virat kohli